Income Tax India आयकर विभागाने आपल्या ट्विटर हॅण्डल वरून एक महत्वाचे आवाहन केले असून २०२३ म्हणजेच पुढील वर्षाच्या मार्च महिना अखेरपर्यंत विभागाने म्हटले की, Pan Card क्रमांक Adhar Card शी जोडणे बंधनकारक आहे. उशीर करू नका. Income Tax India ने म्हटले की, आयकर कायदा, १९६१ नुसार, सवलतीच्या श्रेणीतील पॅन कार्ड वगळता इतर सर्व PAN कार्ड ३१ मार्च २०२३ पूर्वी आधारशी जोडणे बंधनकारक आहे.
तर पॅन कार्ड होणार रद्द….
जर २०२३ मार्च अखेर आधार क्रमांकाशी PAN जोडले गेले नाही तर पॅन क्रमांक निष्क्रिय केले जातील, असे आयकर विभागाने शनिवारी जाहीर केले. Income Tax India च्यावतीने जारी करण्यात आलेल्या सल्लापत्रात ही घोषणा करण्यात आली आहे.बंधनकारक आहे. न जोडलेले पॅन क्रमांक १ एप्रिल २०२३ पासून निष्क्रिय होतील.
या नागरिकांना असेल सूट….
मे २०१७ रोजी केंद्रीय वित्त मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करून सवलत श्रेणीतील व्यक्तींची यादी जारी केली होती. त्यानुसार, आसाम, जम्मू-काश्मीर आणि मेघालयाचे रहिवासी, Income Tax India कायदा १९६१ नुसार अनिवासी नागरिक, ८० वर्षांचे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे नागरिक तसेच भारताचे नागरिक नसलेल्या व्यक्ती यांचा या यादीत समावेश आहे. या यादीतील लोकांना पॅन कार्ड आधारशी जोडण्यातून सूट देण्यात आलेली आहे. त्यांना आजचे सल्लापत्र लागू नाही.
पॅनकार्ड रद्द झाल्यास अडचण होणार…
PAN CARD निष्क्रिय झाल्यास नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पॅन कार्ड शिवाय पुर्ण होणारे कोणतेही काम पूर्ण करू शकणार नाही जसे की, Income Tax विवरणपत्र भरता येणार नाही. प्रलंबित विवरणपत्रे प्रक्रियान्वित होणार नाहीत. करही वाढीव दराने भरावा लागेल. अशा व्यक्तींना बँका आणि अन्य वित्तीय व्यवहारंमध्ये समस्यांचा सामना करावा लागेल.
अत्यंत महत्वाची बातमी????????…
नवीन शैक्षणिक धोरण जाहीर ; १० वी वर्गाचे बोर्ड रद्द…
आयकर अधिनियम,1961 के अनुसार, सभी पैन धारकों के लिए जो छूट की श्रेणी में नहीं आते हैं, 31.03.2023 से पहले अपने पैन को आधार से जोड़ना अनिवार्य है। जो पैन आधार से नहीं लिंक किए गए हैं,वे पैन 01.04.2023 से निष्क्रिय हो जाएंगे।
जो अनिवार्य है,वह आवश्यक है। देर न करें, आज ही लिंक करें! pic.twitter.com/cYBcdImQMw— Income Tax India (@IncomeTaxIndia) December 24, 2022