मुंबई : एकीकडे अनेक देशांमध्ये कोरोनाची लाट ओसरली असता चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. चीनमध्ये कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. औषधांचा तुटवडा निर्माण झालाय. आरोग्यव्यवस्था अपुरी पडत आहे. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह ताटकळत पडले आहेत. एकंदरीत आपत्तीजनक परिस्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण जग पुन्हा एकदा हायअलर्टवर आहे.
भारतातही विशेष काळजी घेतली जात आहे.परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांची चाचणी केली जाणार आहे. जर एखादा रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला तर त्याचं जिनोम सिक्वेन्सिंग करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत.
आज महत्वपूर्ण बैठक
चीनमधील कोरोनाचा उद्रेक पाहता भारतात वेळेतच काही उपाययोजना केल्या जाणार आहेत. भारताची पुढची पावलं काय असतील, त्याची रूपरेषा काय असेल यासंदर्भात आज दिल्लीत महत्वपूर्ण बैठक पार पडतेय. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी एक महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. यात कोरोना रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.
हे पण वाचा..
तुमचेही थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेय! या सरकारी योजनेतून पुन्हा जोडणी होईल?
ग्रा.पं. निवडणुकीतील पराभव जिव्हारी : दोन गटात झालेल्या दगडफेकीत भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू
भिंत तोडून व्हॅन थेट ढाब्याच्या आत घुसली अन्…,घटनेचा थरार Video व्हायरल
खुशखबर.. राज्य सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात विविध पदांची भरती
देशात सध्या केवळ 112 लोकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येत आहे. एकूण सक्रीय रूणांची संख्या साडेतीन हजारांच्या आसपास आहे. पण ही संख्या कायम राखणं आणि कमी करणं गरजेचं आहे. शिवाय परदेशातून येणाऱ्या लोकांमधून भारतात संसर्ग पसरणार नाही याकडे सरकारचं लक्ष असेल.