भारतीय दंड संहितेच्या कलम ५०९ नुसार, जो कोणी एखाद्या महिलेच्या विनयशीलतेचा अपमान करण्याच्या हेतूने उद्गगार काढेल तर तो मोठा अपराध आहे, या संदर्भात राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण ब्यूरो (National Crime Investigation Bureau) ने नुकतेच महिलांची छेड काढणाऱ्या रोडरोमिओसंदर्भात ट्वीट केले आहे त्या मध्ये NCIB ने म्हटलं आहे की,जर कुणी व्यक्ती एखाद्या महिलेला, मुलीला आवारा, छम्मक-छल्लो, आयटम , चुडैल, कलमुखी, चरित्रहीन यासारख्या शब्दांचा वापर करून बोलत असेल, अथवा अश्लील इशारा करत असेल. ज्यामुळे त्या महिलेला आपमानित झाल्यासारखं, लज्जा वाटेल असं वाटत असेल तर आयपीसी ५०९ अंतर्गत त्या व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास अथवा आर्थिक दंड होऊ शकतो… काही प्रकरणात छेड काढणाऱ्याला तुरुंगवास आणि आर्थिक दंड अशा दोनही शिक्षा होऊ शकतात
भारतीय दंड संहितेच्या कलम ५०९ जाणून घ्या…
भारतीय दंड संहितेच्या कलम ५०९ नुसार, जो कोणी एखाद्या महिलेच्या विनयशीलतेचा अपमान करण्याच्या हेतूने, कोणताही शब्द उच्चारतो, कोणताही आवाज किंवा हावभाव करतो किंवा कोणतीही गोष्ट प्रदर्शित करतो, अशा हेतूने तो शब्द किंवा आवाज त्या महिलेला ऐकू येईल. तीन वर्षांपर्यंत वाढू शकेल अशा मुदतीसाठी साधा कारावास, किंवा दंड, किंवा दोन्ही शिक्षा.
स्त्रीच्या शालीनतेचा अपमान करण्याच्या उद्देशाने एखादा शब्द बोलणे किंवा हातवारे करणे. शिक्षा – तीन वर्षे साधी कैद किंवा दंड किंवा दोन्ही. हा जामीनपात्र, दखलपात्र गुन्हा आहे आणि कोणत्याही दंडाधिकार्याद्वारे न्यायपात्र आहे. हा गुन्हा पीडित महिलेने (ज्यांच्या विनयशीलतेचे किंवा गोपनीयतेचे उल्लंघन केले आहे) न्यायालयाच्या परवानगीने केले आहे.
आवश्यक जानकारी :~
————————
यदि कोई व्यक्ति किसी स्त्री को आवरा, माल, छम्मक-छल्लो, आइटम, चुड़ैल, कलमुखी, चरित्रहीन जैसे शब्दों से संबोधित करता है या अश्लील इशारे करता है, जिससे उसके लज्जा का अनादर हो। तो उसे आईपीसी की धारा 509 के तहत 3 वर्ष तक जेल/ आर्थिक दण्ड या दोनों हो सकता है।— NCIB Headquarters (@NCIBHQ) December 16, 2022
हे देखील वाचा…