Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचा नायनाट करण्यासाठी हे करून पहा, निश्चित फायदा होईल…

najarkaid by najarkaid
December 16, 2022
in शेती
0
तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचा नायनाट करण्यासाठी हे करून पहा, निश्चित फायदा होईल…
ADVERTISEMENT

Spread the love

सध्यस्थितीत तूर पिक फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून मागील ३ -४ दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे पतंग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. तसेच अंधारीरात्र असल्यामुळे शेंगा पोखरणाऱ्या अळीचे पतंग मोठ्या प्रमाणावर अंडे देऊ शकतात. या सर्व बाबी तुरीवरील घाटेअळी / शेंगा पोखणारी अळीस पोषक असल्यामुळे सध्या शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येऊ शकतो.

तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचा नायनाट करण्यासाठी हे करून पहा, निश्चित फायदा होईल...

काही ठिकाणी अळीने तुरीवरील कळ्या, फुले व शेंगा फस्त करण्यास सुरुवात केली आहे. या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास ७० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था व प्रथम अवस्थेतील अळी असल्यामुळे वेळीच उपाय योजना केल्यास कमी खर्चात किडींचे नियंत्रण होऊ शकते.

शेंगा पोखरणाऱ्या अळ्या सुरुवातीच्या काळात पिकाच्या कोवळ्या पानांवर, फुलावर किंवा शेंगावर उपजीविका करतात, नंतर शेंगा भरतांना त्या दाणे खातात. दाणे खात असताना त्या शरीराचा पुढील भाग शेंगामध्ये खुपसून व बाकीचा भाग बाहेर ठेऊन आतील कोवळ्या दाण्यावर उपजीविका करतात.

तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचा नायनाट करण्यासाठी हे करून पहा, निश्चित फायदा होईल...

एकात्मिक व्यवस्थापन :

पाने व फुलांची जाळी करणारी अळीची प्रादुर्भावग्रस्त जाळी गोळा करून अळीसह नष्ट करावी तसेच शेंगा पोखरणारी अळीच्या मोठ्या अळ्या हाताने वेचून त्यांचा नायनाट करावा.

तूर पिक कळी लागण्याच्या अवस्थेत आल्यापासून एकरी २ कामगंध सापळे (फेरोमोन ट्रॅप) पिकाच्या वर एक फूट उंचीवर लावावेत व निरीक्षण करावे.
शेतामध्ये पक्षी बसण्यासाठी पिकाच्या किमान एक ते दोन फूट उंचीवर पक्षी थांबे हेक्टरी ५० ते ६० ठिकाणी उभारावेत, यामुळे पक्ष्यांना अळ्यांचे भक्षण करणे सोपे जाईल.
पिक कळी अवस्थेत असतांना निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अझॅडीरॅक्टिन ३०० पीपीएम ५ मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.

अळी प्रथम व द्वितीय अवस्थेत असताना एच.ए.एन.पी.व्ही. विषाणूची ५ मिली १० लिटर पाण्यातून संध्याकाळच्या वेळी फवारणी करावी.

तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचा नायनाट करण्यासाठी हे करून पहा, निश्चित फायदा होईल...

जर किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर आढळून आल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ४.४ ग्रॅम किंवा फ्ल्युबेन्डामाईड ३९.३५ एससी २ मिली किंवा क्लोरॅनट्रीनीलीप्रोल १८.५ एससी ३ मिली किंवा क्लोरॅनट्रीनीलीप्रोल ९.३ + लॅमडा साहॅलोथ्रीन ४.६ झेडसी ४ मिली यापैकी एका कीटकनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मारुका किडीसाठी इंडोक्झाकार्ब १४.५ एससी ८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कीटकनाशकाचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी मात्रा तीन पट वापरावी.

शेतात किटकनाशकांचा वापर करतांना हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा व सुरक्षिततेची योग्य ती काळजी घ्यावी. तसेच गुटखा, तंबाखूचे सेवन करु नये व बीडी ओढू नये.
०००

माहितीः उपसंचालक (कृषी), कृषी आयुक्तालय पुणे,

तांत्रिक माहिती: व.ना.म.कृ.वि.परभणी

संकलनः जिमाका, अकोला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बांबरुड प्र. ब. येथे उद्धव ठाकरे शिवसेनेत रतन परदेशी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश. शिंदे गटाला खिंडार

Next Post

डान्स करताना महिलेला आला हार्ट अटॅक ; मन हेलावून टाकणारा VIDEO व्हायरल

Related Posts

जैन हिल्स येथे २१ डिसेंबरपासून ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५

December 18, 2025
महिला शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार ५०% सबसिडी

Women Tractor Subsidy in India – महिला शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर खरेदीवर ५०% सबसिडी

September 29, 2025
Kisan Credit Card Update : आता शेतकऱ्यांना ५ लाखांपर्यंत कर्ज, कमी व्याजदर, आर्थिक मदत!

August 9, 2025
PM Kisan Yojana

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ₹2000 हप्ता,लगेच यादी चेक करा

July 31, 2025
PM Crop Insurance Kharif 2025: प्रधानमंत्री पीक विमा योजना, शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण!

July 30, 2025
PM Kisan Samman Nidhi

PM Kisan Samman Nidhi: ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही 20 वा हप्ता – तुमचं नाव यादीत आहे का?

July 15, 2025
Next Post
डान्स करताना महिलेला आला हार्ट अटॅक ; मन हेलावून टाकणारा VIDEO व्हायरल

डान्स करताना महिलेला आला हार्ट अटॅक ; मन हेलावून टाकणारा VIDEO व्हायरल

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us