मुंबई : मुंबईतील वन अविघ्न इमारतीच्या 35व्या मजल्याला आग लागल्यानं खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी याच इमारतीला भीषण आग लागली होती. वर्षभरानंतर आता पुन्हा एकदा याच इमारतीत आगीची दुर्घटना घडल्यानं हाहाकार माजलाय. दरम्यान, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे.
लोअर परळ येथील भारत माता सिनेमा जवळ असलेल्या महादेव पालव मार्ग येथे वन अविघ्न पार्क ही इमारत आहे. आज सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी या इमारतीच्या 35व्या मजल्याला आग लागली. ही लेव्हल-1 ची आग असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, दुसऱ्यांदा इमारतीत आग भडकल्यानं रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
https://twitter.com/ssidsawant/status/1603264584789659648
दरम्यान, वर्षभरानं पुन्हा एकदा वन अविघ्न इमारतीला नेमकी आग कशामुळे लागली? या आगीचं नेमकं कारण काय? असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत.