जळगाव : जळगाव सहकार निबंधक कार्यालयातील सहाय्यक सहकार अधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. तक्रारदाराविरोधात अवैध सावकारीचा गुन्हा दाखल होवू नये म्हणून यासाठी प्रकरणाच्या प्रती देण्यासाठी व नाशिकच्या अपिलात मदत करण्यासाठी दहा हजारांची मागणी केली.
ही रक्कम स्वीकारताना जळगाव सहकार निबंधक कार्यालयातील सहाय्यक सहकार अधिकारी शशीकांत नारायण साळवे यास आज शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कार्यालयातच जळगाव एसीबीने अटक केली. या कारवाईने सहकार वर्तुळातील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
हे सुद्धा वाचा…
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात ; केलं हे खळबळजनक वक्तव्य
निवडणुकीपूर्वी मोदी सरकारची भेट, या लोकांना मिळणार ५० हजार; अर्ज करण्याची पद्धत जाणून घ्या
जिल्हा दूध संघ निवडणूक! खडसेंसाठी बाळासाहेब थोरात मैदानात, त्या मतदाराशी संपर्क करून केली ही विनंती?
रेल्वे प्लॅटफॉर्मवर दोन TC बोलत होते, पण तेवढ्यात.. थरारक व्हिडीओ व्हायरल
यांनी केली कारवाई
जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजोग बच्छाव, दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, राकेश दुसाने आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.