अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. या निवडणुकीतही पक्ष मताच्या टक्केवारीत नवा विक्रम करू शकतो. निवडणुकीत भाजपला 52 टक्के मते मिळत आहेत, तर काँग्रेसला 34 टक्के आणि अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला (आप) 19 टक्के मते मिळत आहेत.
भारतीय जनता पक्ष (भाजप) गुजरातमधील विधानसभेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहे आणि पक्ष 152 जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे काँग्रेस २० जागांवर तर आम आदमी पार्टी ६ जागांवर आघाडीवर आहे. 4 अपक्षही आघाडीवर आहेत. गुजरातमध्ये सर्वाधिक जागा जिंकण्याचा विक्रम काँग्रेसच्या नावावर आहे आणि पक्षाने 1985 साली 149 जागा जिंकल्या होत्या.
गुजरात विधानसभा निवडणुकीत जामनगर उत्तर मतदारसंघातून रिवाबा जडेजा ५०० मतांनी पिछाडीवर आहेत. रिवाबा ही भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी आहे. तर गांधीनगर दक्षिण मतदारसंघात भाजपचे अल्पेश ठाकोर ४१३० मतांनी आघाडीवर आहेत. याशिवाय मोरबी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार कांतीलाल अमृतिया १०१५६ मतांनी पुढे आहेत. ऑक्टोबरमध्ये मोरबी पूल कोसळण्याच्या वेळी त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले. गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात 182 जागांवर मतदान झाले. यावेळी 66.31 टक्के मतदान झाले. तर 2017 मध्ये 71.28 मते पडली होती. पहिल्या टप्प्यात 60.20 टक्के मतदान झाले होते.
हे पण वाचाच..
सोन्याचा भाव 61,000 रुपयांपर्यंत जाणार? जाणून घ्या आजचे भाव
पुन्हा एकदा चक्रीवादळाचा धोका ; महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? हवामान खात्याने जारी केला अलर्ट
या आजारांमध्ये पेरू चुकूनही खाऊ नका, नाहीतर..
लग्नासाठी पैशांची कमतरता भासतेय? काळजी करू नका, असे मिळतील पैसे??
दुसऱ्या टप्प्यात ६४.३९ टक्के मतदान झाले. एक्झिट पोलमध्ये दावा करण्यात आला होता की गुजरातमध्ये भाजप पुन्हा जिंकेल आणि 2017 पेक्षा जास्त जागा मिळवतील. झी न्यूजच्या सर्वेक्षणात गुजरातमध्ये भाजपला 110-125 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. 2017 मध्ये भाजपला 99 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 45-60 जागा मिळण्याची अपेक्षा होती.