लग्न सोहळ्यात तुम्ही अनेकदा डीजेच्या तालावर नाचला असाल. डीजे सुरू होताच लग्न सोहळ्यात आलेल्या लहान मुलांसह, महिला, ज्येष्ठ नागरिक यापैकी अनेकजण डान्स करतात. हा डान्स करीत असताना अनेक मजेदार किस्सेही घडत असतात. त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.
या व्हिडिओमध्ये डान्स करण्यात मग्न असलेली एक महिला तोल जाऊन एका लहान मुलाच्या अंगावर पडते. पण त्यानंतर त्या मुलासोबत असं काही घडतं, जे पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला असून त्यावर मज्जेदार कमेंटसुद्धा येत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका फंक्शनमध्ये काही महिला गाण्यावर नाचताना दिसत आहेत. यात एका महिलेसमोर एक जाड महिला नाचत असून या दोघींच्या मध्ये जाऊन नाचण्याचा प्रयत्न एक लहान मुलगा करीत असल्याचे दिसत आहे. सर्वात प्रथम जेव्हा हा मुलगा त्या दोघींच्या मध्ये नाचण्यासाठी जातो, तेव्हा एका महिलेचा त्याला धक्का लागल्यानं तो बाजुला होतो. पण नंतर तो पुन्हा या दोन महिलांच्या मध्ये नाचण्यासाठी येतो. त्याचवेळी नाचत असणाऱ्या जाड महिलेचा पाय अडकतो, व ती थेट मुलाच्या अंगावर पडते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर लोकांनी मजेदार कमेंट केल्या आहेत.