जळगाव : सावकारी कर्जाला कंटाळून अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना जरंडी (ता. सोयगाव) येथे घडलीय. दीपक जनार्दन सुस्ते (वय ३२) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी काय आहे घटना
जरंडीत दीपक सुस्ते पत्नी स्वाती, मुलगी प्रांजल (८), मुलगा पीयूष (वय अडीच) यांच्यासह वास्तव्यास होते. दीपक यांच्या वाट्याला दीड एकर शेती आली होती. पती- पत्नी दोघेही शेतात राबराब राबत होते. मोसंबी आणि कापसाचा (Cotton) पेरा केला. मात्र, लहरी निसर्गाच्या कोपामुळे पीक येऊ शकले नाही. पेरणी, फवारणी, मजुरी, कीटकनाशके, कुटुंबाचे आजारपण, अशा वेगवेगळ्या कारणाने दीपक यांनी खासगी सावकाराकडून वेळोवेळी घेतलेले कर्ज साडेतीन लाख रुपये झाले होते. स्वतःचे शेत करून दीपक शेजारीच दुसऱ्या शेतातही मजुरी करू लागला. सावकाराचा पैशांसाठी लावलेला तगादा आणि शेतजमीन जाण्याच्या दडपणाखाली असलेल्या दीपक सुस्ते यांनी गुरुवारी (ता. १) दुपारी मृत्यूला कवटाळले.
हे पण वाचा..
VIDEO: फुकट जेवण्यासाठी MBAचा विद्यार्थी लग्नात शिरला ; मग काय, पकडला गेल्यानंतर मिळाली ‘ही’ सजा..
डिझेलबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय! जाणून घ्या काय आहे योजना?
दोन विद्यार्थ्यांकडून वर्गातच विद्यार्थिनीवर आळीपाळीने अत्याचार, मुंबईतील घटना
आता महाराष्ट्राच्या मातीतून निघणार सोनं, ‘या’ दोन ठिकाणी सापडल्या खाणी
दीपक गुरुवारी सकाळी लवकरच शेतात गेले होते. दुपारी तीनच्या सुमारास फवारणी करताना, दीपक फवारणीचे द्रावण पिऊन घेतले. त्यामुळे ग्लानी येऊन पडल्यावर शेतात सोबत काम करणाऱ्यांनी आरडाओरड केल्यावर शेजारील शेतकरी आणि ग्रामस्थांनी त्याला उचलून जळगावच्या दिशेने धाव घेतली. जिल्हा सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केल्यावर उपचारादरम्यान दीपकची प्राणज्योत मालवली. तोपर्यंत त्याची पत्नी स्वाती आणि इतर नातेवात्तकांनी जळगाव गाठले. मृत्यूचे कळताच त्यांनी एकच हंबरडा फोडत आक्रोश केला.