मुंबईः मुंबईत लहुजी वस्ताद साळे यांच्या 228 व्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकीय रणसंग्रामासाठी रणशिंग फुंकलं. पक्षाचे चिन्ह म्हणून अन्याय जाळणारी मशाल आपल्याला मिळाली आहे. ही अंधःकार दूर करणारी मशाल आपण तितक्याच ताकतीने वापरू, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. तसेच आगामी मुख्यमंत्री पदाविषयी संकेतही दिले.
महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री विराजनमान करण्याचे मोठे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले. महाराष्ट्राचं रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येऊया. शिवशक्ती भीमशक्ती आणि लहू शक्ती एकत्र आली तर देशात एक मोठी ताकद आपण उभी करू शकतो. मी सध्या अनुभवतोय… गद्दार आता मूठभरही नाहीत. पण निष्ठावान डोंगराएवढे आहेत.
हे पण वाचा..
गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठा दिलासा, पाहा किती झाला सिलेंडर स्वस्त?
चिंता सोडा ; गायरान जमिनीवरील गरीबांची घरे अतिक्रमण काढण्याबाबत राज्यशासनाने घेतला मोठा निर्णय !
आम्ही सुद्धा मंत्री होतो, पण आम्ही कधी थापा मारल्या नाहीत, असे म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला.भाषणात पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्याला राज्यात सत्ता आणायची आहे. मुख्यमंत्रीपदी आपली व्यक्ती असेल. महिला असो किंवा पुरुष…आता आपल्याला मशाल अशी मस्त निशाणी मिळाली आहे. आपल्याला महाराष्ट्राचे रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येऊया.