भडगाव । भडगावमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ४७ वर्षीय महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार भडगाव शहरामधून समोर आला. धक्कादायक म्हणजे महिलेने विरोध केल्यानंतर तिला आगपेटीने पेटवून देत जिवेठार मारण्याचा प्रयत्नही केला. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी काय आहे घटना?
भडगाव शहरात ४७ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २३ नोव्हेंबर रोजी दुपारी महिला शहरातील कोठली रोडवरील एका केंद्राच्या पाठीमागून जात असतांना एक अनोळखी अंदाजे ५० वर्षीय व्यक्ती महिलेजवळ आला. ‘मला संबंध करू दे’, असे म्हणून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, महिलेने विरोध केल्यानंतर तिला जमीनीवर पडून जखमी केले.
हे पण वाचा..
अबब! शिंदे गटातील आमदाराने देवीला अर्पण केलं तब्बल ‘इतके’ तोळं सोनं
.. आता याचा हिशेब तर द्यावाच लागेल ; विरोधकांच्या टीकेवर मंत्री गुलाबराव भडकले
खळबळजनक! लॉजवर नेवून माजी सरपंचाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार
तर तिला आगपेटीने पेटवून देत जिवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार घडल्यानंतर परिसरातील नागरीकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी धाव घेवून जखमी महिलेला भडगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. महिलेच्या जबाबावरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर करीत आहे.