पाचोरा – येथील पीटीसी संस्थेच्या सु. भा. पाटील प्राथमिक विद्यालयातील शिक्षक व पाचोरा तालुका खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे तालुकाध्यक्ष राकेश गोकुळ पाटील यांना राष्ट्रीय एकात्मता दिनी पुणे येथील पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई मानव सेवा ट्रस्टच्या वतीने मणीभाई शिक्षक गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथील धर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास यशवंत खेडकर, राष्ट्रसंत योगिराज महाराज पलांडे, डॉ. अशोक पाटील, डॉ. रवींद्र भोळे, गोविंदा लोखंडे आदी उपस्थित होते. त्यांचे सर्वत्र काैतुक हाेत अाहे.