जळगाव । महिलांवर होणारे अत्याचार काही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. अशातच जळगाव शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेला दुकानावर बोलवून तिच्याकडे शरीर सुखाचे मागणी करत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
नेमकी काय आहे घटना?
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की मेहरून परिसरातील एका भागात 48 वर्षीय महिला वास्तव्यास आहे. याच परिसरात राहणार्या एकाने 13 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता महिलेला एका दुकानावर बोलवून तिच्याकडे शरीर सुखाचे मागणी केली. व महिलेचा विनयभंग केला.
हे पण वाचा..
आता विना तिकीट स्लीपर क्लासमध्ये प्रवास, टीसी थांबल्यास रेल्वेचा हा नियम सांगा
..तर मी धुमधडाक्यात एकनाथ शिंदे गटात प्रवेश ; मुख्यमंत्री शिंदेंना मोठी ऑफर
मुंबईत प्रेम अन् दिल्लीत प्रेयसीची हत्या, 5 महिन्यांनंतर उलगडलं हत्येचं धक्कादायक गूढ
खुशखबर..! खाद्यतेलाच्या किमती घसरल्या, वाचा नवीन दर
या प्रकाराबाबत महिलेने सायंकाळी पुणे सहा वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस तक्रार दिली त्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे हे करीत आहे