जळगाव : राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने पक्ष आक्रमक झाले आहे. सत्तार यांच्या या विधानाचा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून निषेध व्यक्त करण्यात येतोय. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे देखील प्रतिक्रिया दिली आहे. सत्तारांना संस्कार नाहीत. त्यांना आई-वडिलांनी शिकवलं नाही, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी सत्तारांवर निशाणा साधला.
“अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा मी विरोध करतो. हा संस्कराचा परिणाम आहे. आई-वडिलांनी ज्याला शिकवले नाही तो अशा रीतीने बोलू शकतो”, असा घणाघात एकनाथ खडसेंनी केला.
“एका महिलेचा केलेला हा अपमान संतापजनक आहे. याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे. आपले शब्द मागे घेतले पाहिजेत”, अशी भूमिका एकनाथ खडसे यांनी मांडली.