नागपूर : नागपूर शहरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. यात स्कूल व्हॅन चालकाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे अत्याचार करत असताना आरोपीने व्हिडीओ क्लिपही बनवली होती. तसेच याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही केली आहे.
पवन कोहपरे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, आरोपी पवन हा स्कूल व्हॅनचालक आहे. पीडित १५ वर्षीय विद्यार्थीनी अनेक दिवसांपासून त्याच्याच व्हॅनमधून शाळेचा प्रवास करीत होती. स्कूल व्हॅनचालक आणि पीडित मुलगी अनेक दिवसांपासून एकमेकांना ओळखत होते.
१५ ऑक्टोबर रोजी आरोपीने संधीचा फायदा घेत आरोपीने पीडितेवर बलात्कार केला. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. धक्कादायक बाब म्हणजे अत्याचार करत असताना आरोपीने व्हिडीओ क्लिपही बनवली होती.
हे सुद्धा वाचा..
मुंबई पोलीस शिपाई पदाच्या ७०७६ जागासाठी भरती ; असा करा अर्ज, जाणून घ्या पात्रता
राशिभविष्य – ७ नोव्हेंबर : आज या राशींच्या लोकांना मिळेल आनंदाची बातमी..
या क्लिपच्या आधारे आरोपी पवन हा पीडित मुलीला ब्लॅकमेल करत होता. आरोपीच्या कृत्याला कंटाळून अखेर पीडितेने घडलेली सर्व हकीकत आपल्या आई-वडिलांना सांगितली. मुलीवर अत्याचार झाल्याचं कळताच, त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
दरम्यान, पीडित मुलीच्या आई-वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पवन कोहपरे याच्याविरोधात पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे. शालेय मुलीवर स्कूल व्हॅनचालकाने अत्याचार केल्याचं उघड होताच, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.