जळगाव : मंत्री गुलाबराव पाटील आणि शिंदे गटाचेच आमदार चिमणराव पाटील यांच्यात जोरदार वाद सुरू आहे.राष्ट्रवादीच्या नेत्याला आपल्याच मतदारसंघात निधी दिल्याने चिमणराव पाटील नाराज आहे. हा वाद सुरू असतानाच आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली आहे.
चिमणराव आबा, म्हातारपणात तुम्ही गद्दारीचा डाग का लावून घेतला?असा सवालच सुषमा अंधारे यांनी चिमणराव यांना करून डिवचले आहे. चिमणराव पाटील मला माझ्या आजोबासारखे आहेत. मात्र, गुवाहाटीत त्यांचं चिरतारुण्य दिसलं.चिमणराव पाटील तुम्हाला लोक म्हणतील कसं काय पाटील बरं आहे का? गुवाहाटीला गेले ते खरं आहे का?असा चिमटाही त्यांनी यावेळी काढत शिंदे आणि फडणवीस सरकारला टोला लगावला.
दरम्यान, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा भारी आहेत. कारण ते घटनास्थळी पोहाचण्या आधीच त्याचा कॅमेरामन तिथे पोहोचतो, असा खोचक टोला लगावतानाच मुख्यमंत्री निवडला की मॉडेल निवडले? असा संतप्त सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत मला काहीही तक्रार नाही. कारण या सरकारमध्ये त्यांच काहीच चालत नाही, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. तसेच उद्धव ठाकरे आजारी असताना शिंदे यांनीच 40 आमदारांची कुंडली भाजपला पुरवल्याचा आरोपही त्यांनी केला.
हे पण वाचा :
अल्पवयीन मुलीशी मैत्री करून जबरी अत्याचार, भुसावळमधील धक्कादायक घटना
बाप रे बाप! महिला रस्त्याच्या मधोमध थांबली, समोरून बाईक येत होती आणि मग…, पाहा थरारक Video
‘या’ राशीच्या लोकांसाठी प्रगतीची दारे खुली होतील, जाणून घ्या तुमची आजची राशी काय म्हणते??
धावत्या रेल्वेत अविवाहित तरुणीने दिला बाळाला जन्म, नंतर शौचालयात सोडून केला पलायन, पण..
दादा हो, हे भांडते मी तुमच्यासाठी तुमच्या लेकरासाठी. तुमच्या शिकलेल्या मुलांच्या भवितव्यासाठी. त्या मुलांच्या भवितव्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. त्यासाठीच आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरत आहे. त्यामुळे हे लोक आदित्य ठाकरेंना क्रमांक दोनचे पप्पू म्हणत आहेत, अशी टीका त्यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर नाव न घेता केली.