झाशी : उत्तर प्रदेशातील झाशी येथे एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. सहा महिन्यापूर्वीच या महिलेचे लग्न झाले होते. लग्नाच्या ६ महिन्यांनंतर महिला मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, वर्ण सावळा असल्यानं जावयानं लेकीची हत्या केल्याचा आरोप एका वडिलांनी केला आहे. यासोबतच मुलीच्या सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप वडिलांनी केला आहे.
जावयाचं हे दुसरं लग्न होतं. पहिला पत्नी त्याला सोडून गेली होती, असा आरोप मृत महिलेच्या वडिलांनी केला. लग्न करताना जावयानं पहिल्या लग्नाची बाब लपवली. लग्नानंतर जावई सतत मुलीला तिच्या वर्णावरून बोलायचा. तुमची मुलगी काळी आहे. तिचा वर्ण कुटुंबातील कोणाशी मॅच करत नाही. ती कुटुंबात शोभत नाही, असं जावई सतत सुनवायचा, असा दावा सासऱ्यांनी केला.
मुलीच्या वडिलांचा आरोप आहे की त्यांनी त्यांची एकुलती एक मुलगी ज्योती (25 वर्षे) हिचे लग्न 3 मे 2022 रोजी झाशीच्या वीरांगना नगर येथील रहिवासी अनुराग आर्यशी केले. लग्नात सुमारे 30 लाख रुपये खर्च झाले. यानंतरही सासरच्या मंडळींनी चारचाकीची मागणी करून जमीन विकून मागणी पूर्ण करण्यास सांगितले. ज्योतीचा पती अनुराग अभियंता असून एका खासगी कंपनीत काम करतो. त्याचे वडील बँकेतून निवृत्त झाले आहेत.
हे सुद्धा वाचा…
बँक खाते उघडण्यासह सिम कार्ड घेण्यासाठी सरकार बदलत आहे नियम! जाणून घ्या काय आहे?
लोकलमध्ये चढताना चिमुकल्यासह मातेचा गेला तोल, पण जळगावकर RPF मुळे अनर्थ टळला; पहा थरारक VIDEO
नाशिकमध्ये पुन्हा बस पेटली ; घटनेचा थरार VIDEO पहा
फेसबुकवर प्रेम अन् मंदिरात लग्न; वधूचे सत्य समोर येताच तरुणाला बसला धक्का