उत्तराखंड : सध्या सोशल मिडिया आणि त्याद्वारे होणारे फसवणुकीचे प्रकार जगजाहीर आहेत. अनेकवेळा सतर्क राहण्याचे आव्हान करूनही अनेक जण बळी पडत आहेत. अशातच आता उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. तरुणाचे फेसबुकवरून प्रेम झाले आणि दोघांनी लग्न केले. लग्नानंतर तरुणी तरुणाच्या घरी पोहोचली तेव्हा कळले की तिने ज्याच्याशी लग्न केले ती मुलगी नसून किन्नर आहे. यानंतर तरुणाला धक्का बसला. आता किन्नर लग्न मोडण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करत असल्याचा आरोप तरुणांनी केला आहे.
लक्सरच्या रायसी चौकी परिसरात असलेल्या गावातील एका तरुण फेसबुकवर एका तरुणीच्या प्रेमात पडला. दोघांमध्ये प्रेमाच्या गोष्टी होऊ लागल्या. एकमेकांच्या नंबरचीही देवाणघेवाण झाली. मुलीने हरियाणाचे हिसार शहर असा पत्ता दिला. यानंतर दोघांचे नाते अधिक घट्ट झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघेही प्रेमात पडल्यावर तरुणाने तरुणीला लक्सरला बोलावून मंदिरात लग्न केले.
हे सुद्धा वाचा…
मी तुम्हाला तोंडभरून भाऊ म्हणते अन् तुम्ही.. सुषमा अंधारेंचा गुलाबरावांवर हल्लाबोल
अति भयंकर ! तांत्रिकाच्या सांगण्यावरून शिक्षकाचे 8 वर्षीय मुलीसोबत घृणास्पद कृत्य
‘या’ लोकांसाठी आजचा दिवस आहे खास, जाणून घ्या काय सांगते तुमची राशी?
हिवाळ्यात बीटरूटचे सेवन सुरू करा, ‘या’ समस्या होतील दूर
लग्नानंतर तरुणाने मुलीला आपल्या घरी नेले तेव्हा त्याला समजले की, ती मुलगी नाही तर किन्नरआहे. तरुण आता मुलीकडून लग्न मोडण्याची ( किन्नर वधू)पाच लाख रुपयांची मागणी करत आहे. त्याचबरोबर या प्रकरणी पीडित तरुणाकडून आतापर्यंत कोणतीही तक्रार (लकसरमधील फसवणूक) झालेली नाही. लेखी तक्रार आल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल, असे पोलिसांने सांगितले आहे.