जळगाव: शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. आता त्यावरून सुषमा अंधारे यांनी त्यांच्याच मतदारसंघात जाऊन जोरदार हल्ला चढवला आहे. मी तुम्हाला तोंडभरून भाऊ म्हणते आणि तुम्ही माझा बाई असा एकेरी उल्लेख करता? ही कोणती पद्धत आहे? असा संतप्त सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.
गुलाबराव पाटील गद्दारीचा शिक्का घेऊन फिरत आहे. गुलाबराव पाटील यांना पाणीवाले बाबा व्हायचं आहे, अशीही टीका त्यांनी केली. दरम्यान, सुषमा अंधारे काल धरणगावात होत्या. यावेळी त्यांनी संवाद साधताना थेट गुलाबराव पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.
मात्र, धरणगावात 25 दिवस पाणी सुटत नाही. पाणी पिनेवाला बाबा तुम्ही आहात. पण ते पिण्याचं पाणी आहे की सायंकाळी ग्लासात घेण्यात येणारे पाणी आहे, याचा शोध घ्यायला हवा, असा हल्ला सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर चढवला. गुलाबराव पाटील माझा बाई म्हणून एकेरी उल्लेख करतात. मी तुमचा हजारवेळा भाऊ म्हणून उल्लेख करते. तरीही तुम्ही माझा एकेरी उल्लेख करता. ही कोणती पद्धत आहे? असा सवाल त्यांनी केला.
हे सुद्धा वाचा…
अति भयंकर ! तांत्रिकाच्या सांगण्यावरून शिक्षकाचे 8 वर्षीय मुलीसोबत घृणास्पद कृत्य
‘या’ लोकांसाठी आजचा दिवस आहे खास, जाणून घ्या काय सांगते तुमची राशी?
हिवाळ्यात बीटरूटचे सेवन सुरू करा, ‘या’ समस्या होतील दूर
शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पण त्यावर ते चकार शब्द बोलत नाहीत. त्यावर बोलण्यासाठी अभ्यास असायला हवा. कसे बोलतील?, असा टोलाही त्यांनी गुलाबराव पाटील यांना लगावला. तसेच गुजरातला जाणाऱ्या प्रकल्पावरून राज्य सरकारवर टीकाही केली.