सोलापूर,(प्रतिनिधी)- आमच्या वरिष्ठ नेत्यांची पोलीस सुरक्षा रद्द करणे म्हणजे ही तर सरळ सरळ ‘दडपशाही’ आहे असा आरोप सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस आणि रावण साम्राज्य सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सुयश गायकवाड यांनी म्हटले आहे.
केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या जुलमी राजवटीला विरोध करणारा आणि राज्यातील सामान्य जनतेचा आवाज असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसच्या माजी मंत्र्यांची पोलीस सुरक्षा काढून घेणे. म्हणजे दडपशाही असल्याचा आरोप सुयश गायकवाड यांनी केला आहे. आज ते येथे पत्रकारांशी बोलतांना हा आरोप केला आहे.
राज्यातील भाजपाप्रणित एकनाथ शिंदे सरकारने, अलीकडेच महाविकास आघाडीतील काही नेत्यांची पोलीस सुरक्षा अचानक रद्द केली. ज्यावर, विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य शासनावर टीकेचा मोहोळ उठवला आहे. तर, हा दडपशाहीचा निर्णय आहे असेही सुयश गायकवाड यांनी म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या संविधानाच्या माध्यमातून येथील नागरिकांना दिलेल्या लोकशाहीचा अवमान होत असल्याचे मत व्यक्त करून त्यांनी राज्य सरकारने सुडाची भावना न ठेवता सर्व राजकारणी आपण एक आहोत महाराष्ट्र राज्याचे नागरिक आहोत आपण राज्यासाठी च राजकारण करत आहोत याचा विचार करून सुडाची भावना न ठेवता राजकारण करावे असेही त्यांनी म्हटले आहे.
तर, अभिनेत्री कंगना राणावत तसेच माजी खासदार किरीट सोमय्या इत्यादी असे कोणते समाजविधायक काम करतात, कि त्यांना वाय दर्जाची पोलीस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे? असा प्रश्न उपस्थित करत समाजात दुही आणि अशांतता पसरवणाऱ्याला हे राज्य सरकार सुरक्षा देत असून, समाजात अन्यायाच्या विरोधात लढवून जनतेला न्याय मिळवून देणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांचा आवाज दडपण्यासाठीच त्यांची पोलीस सुरक्षा रद्द करण्यात आली आहेअसेही सुयश गायकवाड यांनी म्हटले आहे.