सोलापूर, (महेश गायकवाड)- अक्कलकोट तालुक्यात उद्धव ठाकरे यांच्या गटाला प्रचंड मोठा हादरा आज शुक्रवार दिनांक 28 ऑक्टोबर 22 रोजी बसला आहे.अक्कलकोट तालुक्यातील उद्धव ठाकरे शिवसेनेच्या सर्वच्या सर्व च पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे आज पत्रकार परिषद घेऊन दिले आहेत, सर्व शिवसैनिक व अक्कलकोट तालुका प्रमुख संजय देशमुख आणि अक्कलकोट शहर प्रमुख योगेश दादा पवार यांनी आपापले राजीनामे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ तसेच सोलापूर जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्याकडे सादर केले आहेत.
यामुळे अक्कलकोट तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेला मोठा हादरा मानला जातं आहे.अक्कलकोट तालुक्यात गेल्या तीन वर्षात शिवसेना गावागावात पोहचविण्यात तालुका प्रमुख संजय देशमुख यांनी फार मोठे कष्ट व मेहनत घेतली होती, परंतु गेल्या अडीच वर्षात पक्ष नेत्रत्वाने अक्कलकोट तालुक्यातील तालुका प्रमुख तसेच अक्कलकोट शहर प्रमुख यांच्या कडे कधीच लक्ष दिले नाहीत, इतकेच नाही तर शिवसेनेचा मुख्यमंत्री असतांना ही गेल्या अडीच वर्षात कोणत्याही प्रकारची विकास कामे करण्यासाठी अथवा कोणत्याही प्रकारचे जनहिताच्या कामाकडे दुर्लक्ष केले यामुळे पक्षात प्रचंड प्रमाणात नाराजी पसरली होती, या नाराजीचा स्फोट आज झाला आणि सर्व पदाधिकारी आणि तालुका प्रमुख शहर प्रमुख यांनी राजीनामे दिले.
अक्कलकोट तालुक्यातील विकास कामांना गती मिळावी तालुक्यातील कोणत्याही प्रकारच्या कामांना विरोध होऊ नये यासाठी म्हणून सहकार्य करण्याची भूमिका यापुढे आम्ही बजावणार आहोत असे याप्रसंगी सांगण्यात आले.उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी शिवसेना तालुकाप्रमुख संजय देशमुख व शहरप्रमुख योगेश पवार यांनी पक्षपदाचा व शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे अक्कलकोट तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे, कारण हे दोन्ही नेते प्रचंड ताकदवान आणि अनुभवी नेते होते,त्यांनी अक्कलकोट तालुक्यात घराघरांपर्यंत शिवसेना पोहचविण्यासाठी मोठी मेहनत व परिश्रम घेतले होते.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे अक्कलकोट तालुकाप्रमुख संजय देशमुख व शहरप्रमुख योगेश पवार व पदाधिका-यानी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे देखील पक्षपदाचा व पक्ष सदसत्वाचा राजीनामा दिले आहेत . अडीच वर्षा पासुन कोणतेच काम न झाल्यामुळे पदाधिका-यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती, यामुळेच आम्ही पक्ष पदाचे राजीनामे देत आहोत असेही संजय देशमुख यांनी प्रस्तुत प्रतिनिधी शी बोलतांना सांगितले.