मुंबई । शिंदे – फडणवीस सरकारला समर्थन देणारे अमरावती जिल्ह्यतील आ. बच्चू कडू व आ. रवी राणा यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून रवी राणा यांच्याकडून कडू यांच्यावर बेछूट आरोप सुरु आहेत. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन खोके घेतले, असा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला होता. याविरोधात दाद मागूनही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात अद्याप कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. त्यामुळे आता बच्चू कडू यांनी सरकारची साथ सोडून वेगळ्या वाटेने जाण्याचा इशारा दिला आहे.
बच्चू कडू यांनी बुधवारी अमरावती येथे झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत सूतोवाच केले. विशेष म्हणजे यावेळी बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याच्या विरोधात भूमिका घेत उद्धव ठाकरे यांची बाजूही उचलून धरली. त्यामुळे बच्चू कडू टोकाचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
हे पण वाचा..
रोज रिकाम्या पोटी 4 तुळशीची पाने चावा, मधुमेहासह हे 5 आजार होतील दूर
शेतकऱ्यांना दरमहा मिळते 3000 रुपये पेन्शन, या योजनेचा असा घ्या लाभ??
कडू म्हणाले, पन्नास खोक्यांचा आरोप विरोधकांकडून होत असताना आम्ही दर्लक्ष केले. पण सत्तेत सहभागी असलेले आ. रवी राणा यांच्याकडून चुकीचे आरोप झाल्याने जनतेत चुकीचा संदेश गेला आहे. राणांच्या आरोपामुळे शिंदे सरकारला पाठिंबा देणारे इतर आमदारही दुखावले आहेत. आम्ही आठ ते दहा आमदार एकत्र बसणार आहोत.
प्रहारच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांशीही आपण चर्चा करू. १ नोव्हेंबरपर्यंत राणा यांनी माफी मागितली नाही किंवा आरोपाशी संबंधित पुरावे दिले नाहीत तर वेगळा निर्णय घेऊ व बच्चू कडू स्टाईलनेच आरोपांना उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.