अमरावती, दि. २४ (प्रतिनिधी) – खोक्यावरून अपक्ष आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात जोरदार वाद पेटला असून हा वाद आता बच्चू कडू यांनी थेट पोलीस ठाण्यात नेला आहे.यात त्यांनी आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.या वादावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘सामना’ मुखपत्रातून गुवाहाटी’च्या सौदेबाजीचे बिंग फुटले या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले आहे.
काय म्हटले होते अपक्ष आमदार रवी राणा…
बच्चू कडू हे फर्स्ट्रेशनमध्ये गेले आहेत. बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीला धोका दिला. गुवाहाटीमध्ये जाऊन त्यांनी कोटींचा व्यवहार केला, असा खळबळजनक आरोप रवी राणा यांनी केला होता.’बच्चू कडू हा तोडपाणी करणारा आमदार आहे. खोके मिळाल्यानंतरच तो गुवाहाटीला गेला होता,’ असा सनसनाटी आरोप रवी राणा यांनी केला होता. त्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी चर्चा होतांना पाहायला मिळाली.
एकमेकांवर केलेल्या आरोप इतक्या टोकाला गेले की बच्चू कडू यांनी अमरावतीतील पोलीस स्टेशन गाठत तक्रार केली आहे.बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्या किराणा वाटपावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले. हा वाद आता टीकेपुरता मर्यादित राहिला नसून हा वाद आता पोलीस स्टेशनपर्यंत गेला आहे. बदनामी केली असल्याचा आरोप करत रवी राणांविरोधात बच्चू कडू यांनी अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
मी पैसे घेतले असतील तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगावे
अपक्ष आमदार रवी राणा यांनी मी पैसे घेऊन गुवहाटी गेलो असल्याचा आरोप केला असून मी पैसे घेऊन जर गुवाहाटीला गेलो असेल तर पैसे देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदेजी यांनी दिले असतील. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तुम्ही पैसे दिले असेल तर स्पष्ट करा, असे बच्चू कडू यावेळी म्हणाले.
बदनामी आमदार रवी राणा यांनी माझी बदनामी केली आहे. 20-20 वर्षे आम्ही राजकीय करिअर उभं करायला गेलं आहेत. रवी राणा यांनी जे काही आरोप केले आहेत त्याचे पुरावे द्यावे. विषय छोटा नाही. आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून सांगता. दुसरीकडे स्वतः मंत्रिपदाच्या रांगेत उभे राहता आता आरपारची लढाई लढायला मी तयार आहे. असे विधान यावेळी बच्चू कडू यांनी केले. जिथे म्हणाल तिथे एकटा यायला तयार आहे, असे खुल आव्हान बच्चू कडू यांनी रवी राणा यांना दिले आहे.