जळगाव : धनत्रयोदशीला सोने खरेदीसाठी उत्तम मुहूर्त मानला जातो. या दिवशी सोन्याची खरेदी करणे शुभ मानले जाते आणि म्हणून या निमित्ताने जळगावच्या सुवर्णनगरीत सराफा दुकानांत गर्दी केल्याचं दिसत आहे.
यंदा जागतिक पातळीवर सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीचा परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीत देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान आजच्या सोन्याच्या दरांबाबत बोलायचे तर आज हे दर ५१ हजार रुपये प्रति ग्रॅम इतके कमी झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना आज सोने खरेदीसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
मागील वर्षी याच दिवशी सोन्याचे भाव प्रति तोळा ५३ हजार रुपये इतके होते, मात्र यंदा तब्बल दोन ते अडीच हजार रुपये भाव कमी होऊन ५१ हजार प्रति तोळा झाल्यामुळे नागरिकांनी सोने खरेदीसाठी जळगावच्या सुवर्णनगरीत गर्दी केली आहे. सुवर्णनगरीतील दुकानांमध्ये अक्षरशा नागरिकांची सोने खरेदीसाठी जत्रा भरल्याच चित्र पाहिलं जाऊ शकतं.