नवी दिल्ली : तुम्ही जर आज सोने आणि चांदी खरेदीचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात तेजी येईल, असे दिसून येत होता. मात्र सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. सणासुदीच्या काळात सोन्याचे भाव कमी होत आहेत. आज शुक्रवारी 21 ऑक्टोबर रोजीही भारतीय वायदा बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात मंदी आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात 0.22 टक्क्यांनी घसरला आहे. त्याचवेळी एमसीएक्सवर आज चांदीचा दर 0.47 टक्क्यांनी घसरला आहे.
शुक्रवारी सकाळी 9:05 वाजता वायदे बाजारात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 109 रुपयांनी घसरून 50,034 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. सोन्याचा भाव आज 50,069 रुपयांवर उघडला. एकदा तो 50,014 रुपयांवर गेला. नंतर त्यात थोडी ताकद आली आणि किंमत 50,034 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. आज मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर चांदीची किंमतही नरम आहे. चांदीचा दर आज 264 रुपयांनी घसरून 56,389 रुपयांवर आला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने घसरले, चांदी वधारली
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. सोन्याचा स्पॉट किमती आज 0.08 टक्क्यांनी घसरून $1,626.25 प्रति औंस झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात वाढ झाली आहे. चांदीची स्पॉट किंमत 1.11 टक्क्यांनी वाढून आज 18.62 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे.
हे सुद्धा वाचा..
पोरांनो तयारीला लागा! 75 हजार रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा
आजचे राशीभविष्य : तुमच्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या
फेसबुकवर मैत्री, मैत्रीतून प्रेम आणि मग लग्न ; पण लग्नानंतर मुलीसोबत घडला धक्कादायक प्रकार..
लग्नानंतर नववधूला प्रियकराचा तसल्या कामासाठी फोन, अन मग…
सराफा बाजारात शहराचा कल
एक दिवस आधी गुरुवारीही भारतीय सराफा बाजारात सोन्याचा भाव ५०,५१६ रुपयांपर्यंत स्वस्त झाला. एक किलो चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाली. ते 56,451 रुपये प्रति किलो दराने विकले गेले. गुरुवारी सोन्याचा भाव 66 रुपयांनी घसरून 50,516 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्यामुळे मागील व्यवहारात सोन्याचा भाव 50,582 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. यादरम्यान चांदीचा भाव 101 रुपयांनी वाढून 56,451 रुपये प्रति किलोवर बंद झाला. गेल्या सत्रात चांदी 56,350 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.