जळगाव : काही दिवसापूर्वी राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर आता आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची दि २० रोजी रात्री उशिरा बदली झाली असून जळगाव पोलीस अधीक्षकपदी नागपूर लोहमार्ग पोलीसचे एम.राजकुमार यांची वर्णी लागली आहे.
दरम्यान, जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची बदलीने अद्याप पदस्थापना करण्यात आलेली नसून त्याचे स्वतंत्र आदेश पारित होण्याची शक्यता आहे.