मुंबई : एकीकडे थंडीची चाहूल पडू लागली असतात राज्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. अनेक भागात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच राज्यातील विविध भागांना पुढील तीन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या भागांना पावसाचा इशारा?
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 15 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. 16 ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील सर्वच जिल्ह्यात तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. यासोबतच 17 ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. 18 ऑक्टोबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा अंदाज आहे.
हे सुद्धा वाचा..
रात्री खोलीत झोपायला गेले अन् सकाळी उघडकीस आला धक्कादायक प्रकार
धक्कादायक ! चिठ्ठी लिहत प्रेमीयुगुलाने संपविले जीवन*
एकनाथ खडसेंबाबत गिरीश महाजनांचा धक्कादायक दावा, म्हणाले..
काकाच्या प्रेमात वेडी झाली पुतणी, दोघांनी पळून जाऊन केलं लग्न पण.. नंतर घडलं भयानक
दरम्यान, मान्सून वायव्य भारतातून 3 ऑक्टोबर रोजी परतल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. माघारीस पोषक वातावरण होत असल्याने चार ते पाच दिवसांत मध्य भारताच्या काही भागातून मान्सून गायब होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.