सोलापूर (अक्कलकोट)। महेश गायकवाड – शिक्षण हे केव्हाही घेता येते त्याला वयाची मर्यादा नसते किंवा कशाची अट नसते असेच प्रदीर्घ कालखंड उलटून गेल्यावर ही म्हणजे लग्ना मुळे खंडित झालेले शिक्षण तब्बल 12 वर्षानंतर त्यांनी सुरू करून एक नवा आदर्श समाजात निर्माण केला आहे, ही घटना अक्कलकोट शहरातील माणिक पेठ मधील लोक शाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथे झाली आहे.
अक्कलकोट येथे रेश्मा देडे/पारखे हि पदवीच्या प्रथम वर्षात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.रेश्मा देडे – पारखे या सन 2011 ला 12 ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या, परंतु त्यांचे लग्न झाल्यामुळे पुढील शिक्षणात खंड पडला होता.
शिक्षणाचे महत्व व काळाची गरज ओळखून त्या निराश व विचलित न होता बारावीनंतर तब्बल दहा वर्षाच्या गॅप नंतर शिक्षणाची नाळ तुटू न देता विवेचंनात व गोंधळलेल्या अवस्थेत एकाग्रता आणि अभ्यासाच्या जोरावर पुन्हा एकदा शिक्षणाला सुरुवात केली होती, हे शिक्षण घेत त्यांनी पदवीच्या प्रथम वर्षात प्रवेश घेऊन त्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचा पुन्हा एकदा आत्मविश्वास वाढला आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधी शी बोलतांना नोंदविली.
माझे बघून यामुळे इतर महिलांना प्रेरणा मिळून आपले अपूर्ण शिक्षण त्या देखील पूर्ण करून नव्या जोमाने व आत्मविश्वासाने त्यांना जगण्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. रेश्मा देडे-पारखे यांचे पुढील शिक्षण सी.बी. खेडगीज महाविद्यालय अक्कलकोट येथे चालू आहे. समाजातील वेगवेगळ्या स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. या कामी तिला मातंग समाजा चे अध्यक्ष निवृत्ती पारखे व फकीरा दल सोलापूर जिल्हा प्रमुख जय भाऊ पारखे यांची प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले असल्याचे रेश्मा यांनी सांगितले.