सोलापूर अक्कलकोट, (महेश गायकवाड) –अक्कलकोट संस्थानच्या वतीने आयोजित दसरा महोत्सवासाठी अक्कलकोट तालुक्यातील व इतर सर्व ठिकाणच्या नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
अक्कलकोट संस्थांनचा शाही दसरा महोत्सव इतिहासात भव्य प्रमाणात होत असे तीच परंपरा यापुढे ही श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी कायम ठेवली असून दसरा दिवशी बुधवार दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजता जुना राजवाडा पासून ते शरणमठापर्यंत राजघराण्याच्या प्रथा आणि परंपरेप्रमाणे रॅली काढण्यात येणार आहे तिथे शमी वृक्षाचे पूजन केल्यानंतर परत जुना राजवाडा येथे मुख्य सोहळा होणार आहे व सिमोल्लंघन केले जाणार आहे.
तदनंतर नागरिक आणि राजे परस्परांना आपट्याची पाने देऊन शुभेच्छा देतील.
राज घराण्याच्या देवघरातील भवानी मातेच्या दर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता होईल.अक्कलकोट संस्थानला गत वैभव प्राप्त व्हावे इतिहासाबरोबरच भविष्यातील सुंदर आणि आदर्शवत अक्कलकोट निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे त्यासाठीही नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी केले आहे. यानंतर राजे नरेश मालोजीराजे हे नागरिकांच्या भेटीगाठी घेतील व राजघराण्याच्या देवघरातील दर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
श्रीमंतराव मालोजीराजे शहराच्या प्रमुख मार्गावरून जात असताना नागरिकांच्या वतीने जागोजागी सत्कार आणि पुष्पवृष्टी केली जाणार आहे या पत्रकार परिषदेचे स्वागत आणि प्रास्ताविक मानकरी बाबासाहेब निंबाळकर यांनी केले तर स्वामीराव हरवाळकर यांनी आभार मानले.
…………
अक्कलकोट राजघरण्याच्या वतीने 1707 पासून ते आज पर्यंत महाराष्ट्र कुलस्वामिनी आणि अक्कलकोट राजघराण्याची कुलदैवता तुळजाभवानीला महावस्त्र अर्पण केले जाते श्रीमंत मालोजीराजे भोसले स्वतः तुळजाभवानीला महा वस्त्र अर्पण करणार आहेत.अशी माहिती अक्कलकोट संस्थांनच्या वतीने देण्यात आली.
….