भुसावळ : देशात सणासुदीचे दिवस सुरु आहे. येत्या दोन दिवसावर दसरा सण आला आहे. त्यानंतर काही दिवसावर दिवाळी. या काळात होणारी गर्दी पाहता रेल्वेकडून अनेक विशेष गाड्या चालविल्या जात आहे. अशातच दसरा, दिवाळीनिमित्त भुसावळ विभागातून काही गाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गाेरखपूर, नागपूर, समस्तीपूर बलियासाठी विशेष रेल्वेच्या महिनाभरात ८२ फेऱ्या हाेणार आहेत. या सर्व गाड्या मुंबईतून सुटल्यावर भुसावळ विभागातून धावतील. दसरा, दिवाळीला रेल्वे गाड्यांना खच्चून गर्दी होते. आरक्षण मिळत नसल्याने प्रवाशांचे हाल होतात.
हे पण वाचा :
राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. या शेतकऱ्यांच्या खात्यात १५ दिवसात होणार ‘इतके’ पैसे जमा
कोणत्या बँकेत सर्वात स्वस्त शैक्षणिक कर्ज मिळते? पहा येथे बँकांची यादी
मोठी बातमी ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 8वी ते ग्रॅज्युएटसाठी बंपर भरती
त्यामुळे रेल्वे प्रशासनाने नवीन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात दादर ते वलिया ही गाडी ३ ते ३१ ऑक्टोबर धावेल. ही गाडी दादर येथून साेमवारी, बुधवार व शुक्रवारी सुटेल. तर वलिया-दादर ही गाडी वलिया येथून बुधवार, शुक्रवार व रविवारी सुटेल. दादर-गाेरखपूर एक्स्प्रेस आठवड्यातून चार दिवस धावेल.