जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहे. शिंदे गट आणि शिवसेना गटाकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. अशातच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाचे ५० आमदार निवडून आले तर मी हिमालयात जाईन असं वक्तव्य करुन शिंदे गटातील आमदारांना आव्हान दिले आहे. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देत पलटवार केला आहे.
“स्वतः निवडून आले नाही, एमआयएम ने पाडून टाकलं, पहिले तू सुधर…लोकांचं काय पाहतो” असा एकेरी शब्दात उल्लेख करत चंद्रकांत खैरे यांच्यावर गुलाबराव पाटील यांनी बोचऱ्या शब्दात टीका करत जोरदार पलटवार केला आहे.
हे पण वाचा :
कपाशीच्या शेतात घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना
दहावी, आयटीआय उत्तीर्णांसाठी खुशखबर.. रेल्वेत नोकरीची संधी ; लगेचच करा अर्ज
सासऱ्याने सुनेचा रुमालाने गळा, नाक व तोंड दाबून केलं ठार ; जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना
भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी गुलाबराव पाटील उपस्थित होते यावेळी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.