कोल्हापूर : राज्यात महिलांवर होणारे अत्याचार काही केल्या कमी होत नाहीय. दिवसेंदिवस या घटना वाढतच असल्याचे दिसून येतेय. असाहतच कोल्हापुरात बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एका घटना उघडकीस आली आहे. कोल्हापूर शहराच्या हद्दीला लागून असणाऱ्या गावात धक्कादायक घटना घडल्याने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे.
येथे विकृत बापाने पोटच्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीशी गेल्या दोन वर्षांपासून जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवल्याची घटना समोर आली आहे. संबंधित पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचे समोर आल्यानंतर हा धक्कादायक समोर आला. याबाबत पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हे पण वाचा :
तुम्ही श्रीमंत आता तर.. खडसेंच्या टीकेवर गुलाबराव पाटलांचा टोला
सरकारच्या ‘या’ योजनेमुळे लाखांहून अधिक लोकांना मिळाला रोजगार, जाणून घ्या अर्जाची पद्धत?
या स्मॉल फायनान्स बँकेने FD चे दर 1% ने वाढवले! आता ग्राहकांना ‘इतके’ टक्के परतावा
13 वर्षीय अल्पवयीन मुलगी 7 महिन्यांची गरोदर, बहिणीच्या दिराने केला अनेकवेळा अत्याचार
दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलीशी बापाने 2020 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. संबंधित मुलीला दवाखान्यात तपासणीसाठी गेल्यानंतर गर्भवती असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पीडिताने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील कार्यवाही सुरु केली आहे. पोलिसांनी विकृत बापाविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.