दहावी पास उमेदवारांना भारतीय पोस्टात नोकरीची संधी आहे. पोस्टात विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2022
या पदांची होणार भरती?
भरतीद्वारे मेकॅनिकची 1, इलेक्ट्रिशियनची 2, पेंटरची 1, वेल्डरची 1 आणि सुताराची 2 पदे भरली जाणार आहेत.
आवश्यक पात्रता
संबंधित ट्रेडमधील प्रमाणपत्र धारक किंवा या ट्रेडमधील 1 वर्षाचा अनुभव असलेले 8 वी पास असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. यासोबतच मोटार वाहन मेकॅनिक पदांसाठीही ड्रायव्हिंग लायसन्स अनिवार्य आहे.
वय श्रेणी
18 ते 30 पर्यंत.
वेतन : दुसरीकडे, निवडलेल्या उमेदवारांना सातव्या वेतनश्रेणी आयोगाच्या लेव्हल 2 पे मॅट्रिक्स अंतर्गत पगार म्हणून 19900 ते 63200 दिले जातील.
हे पण वाचा :
पदवी पाससाठी खुशखबर.. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1673 रिक्त पदांची भरती
भारतीय हवामान विभागात ‘या’ पदांसाठी मोठी भरती ; इतका पगार मिळेल
नोकरीची मोठी संधी… 10वी ते ग्रॅज्युएट उत्तीर्णांसाठी मुंबईत 1041 जागांसाठी भरती
कर्मचारी निवड आयोगामार्फत तब्बल 20,000 पदांसाठी मेगाभरती ; 12वी ते ग्रॅज्युएटसाठी संधी..
अर्ज कसा करायचा
उमेदवारांनी अधिसूचनेमध्ये दिलेल्या नमुन्यात अर्ज भरून ‘द मॅनेजर, मेल मोटर सर्व्हिस, सीटीओ कंपाउंड, तल्लाकुलम, मदुराई-625002’ वर पाठवणे आवश्यक आहे. स्पीड पोस्ट किंवा नोंदणीकृत पोस्टद्वारे अर्ज पाठविला जाऊ शकतो. याशिवाय, उमेदवार https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Recruitment/IP_19092022_MMS_TN_Eng_01.pdf या लिंकवर भेट देऊन भरती अधिसूचना पाहू शकतात आणि सर्व माहिती तपासू शकतात.