मुंबई: सर्वांना खळखळून हसवणारा कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची झुंज अखेर अपयशी ठरली. राजू श्रीवास्तव यांचं एम्स रुग्णालयात निधन झालं. ते 58 वर्षांचे होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर गेल्या ४१ दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्यावर डॉक्टरांची मोठी टीम उपचार करत होती मात्र त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले असून आज अखेर राजू श्रीवास्तवयांची प्राण ज्योत मालवली.
डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड म्हणून घोषित केलं होतं. आज त्यांच्या हृदयाचे ठोके मंदावल्यानं त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. हिंदी सिनेसृष्टीत अनेक वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा कलाकार आज काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या जाण्यानं सिनेसृष्टीवर शोककळा निर्माण झाली असून सर्व स्थरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांच्या मृत्यूपश्यात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत.
हे पण वाचा :
‘गुडबाय लाइफ’ स्टेटस ठेवत तरुणाने आधी गर्लफ्रेंडला संपविले, नंतर..
3 राशींचे भाग्य 3 दिवसात उलटेल, सुख आणि संपत्ती देणारा शुक्र देईल भरमसाठ पैसा!
200 रुपयांच्या गुंतवणुकीवर 28 लाखाचा परतावा, जाणून घ्या ‘या’ सरकारी योजनेबाबत..
Video: पती हॉटेलमध्ये दुसऱ्या महिलेसोबत करत होता रोमान्स ; तितक्यात पत्नी आली अन्..
राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यापासून त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नव्हती. ब्रेन डॅमेज झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांना उपचारांती व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक होती.