आग्रा : उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका हॉटेलमध्ये अन्य एका महिलेसोबत रोमान्स करणाऱ्या पतीला पत्नीने बेदम मारलं आहे. पती हॉटेलमधील खोलीत दुसऱ्या महिलेसोबत रोमॅन्स करत होता. त्यावेळी पत्नी अचानक तिथे पोहोचली. पतीला पाहून पत्नी संतापली. तिनं चपलेनं पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली.
हा प्रकार दिल्ली गेट परिसरातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवरी रोड येथे राहणारा दिनेश हा रुग्णालयात काम करतो. दिनेशचे एका महिलेसोबत अवैध संबंध असल्याचा आरोप त्याची पत्नी नीलम हिने केला आहे. ही बाब त्याला समजताच दोघांमध्ये भांडण सुरू झाले.
यामुळे व्यथित होऊन नीलम आपल्या माहेरच्या घरी जाऊन राहू लागली. सोमवारी तिला दिनेश या महिलेसोबत दिल्ली गेट येथील हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळाली. नीलम ताबडतोब भावासोबत हॉटेल गाठली. खोलीत प्रवेश करताच दिनेश दुसऱ्या महिलेसोबत असल्याचे तिने पाहिले. रागाच्या भरात नीलमने पतीला चप्पलने मारहाण करण्यास सुरुवात केली. यासोबतच अन्य महिलेलाही चप्पलने मारहाण करण्यात आली.
https://twitter.com/newstracklive/status/1572154546474061825
यादरम्यान दिनेश पत्नी नीलमची माफी मागत राहिला. नीलमच्या भावाने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही बनवला, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दिनेश वारंवार पत्नीची माफी मागत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दिनेश म्हणतो, “चूक झाली आहे. ते पुन्हा होणार नाही. या वेळी माफ कर.” तर दुसरी महिलाही नीलमची माफी मागत आहे. रडत रडत बाई म्हणते, “आता पुन्हा असं होणार नाही. मला माफ कर.” हॉटेलमध्ये तासनतास हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता. पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ एक पथक घटनास्थळी पोहोचले. दिनेश आणि महिलेला घेऊन पोलीस ठाण्यात आले.
दिनेशच्या अनैतिक संबंधामुळे ती माहेरी राहत असल्याचे नीलमने पोलिसांना सांगितले. मंगळवारी तिने पती दिनेश याला हॉटेलमध्ये दुसऱ्या महिलेशी प्रेम करताना पकडले असता, महिलेने प्रथम त्याला धमक्या देण्यास सुरुवात केली. नीलम आणि तिच्या भावांना खोट्या प्रकरणात अडकवणार असल्याचे सांगितले. हे ऐकून नीलमला राग आला आणि तिने पती दिनेश आणि महिलेला चप्पलने मारहाण करण्यास सुरुवात केली. यासोबतच नीलमच्या भावाने त्याचा व्हिडिओही बनवला आहे.