मुख्यमंत्री यांच्या सारखा दिसणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखी दाढी वाढवून हुबेहूब गॉगल घालून मुख्यमंत्री यांचे डुप्लिकेट म्हणून लोकप्रिय झालेले पुण्यातील विजय माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुणे शहरातील बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे कारण….
डुप्लिकेट सीएम विजय माने यांनी आरोपी शरद मोहोळ याच्यासोबत एक फोटो काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्यमंत्र्यांचा वेश परिधान करत अनेक ठिकाणी विजय माने हजेरी लावत असतात.
आरोपी शरद मोहोळ याच्यासोबत फोटो व्हायरल झाल्याने पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांनी बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. पोलिसांनी विजय नंदकुमार माने याच्यावर IPC 419-511, 469, 500, 501, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. समाजात मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
डान्स चा व्हिडीओ देखील झाला होता व्हायरल
डुप्लिकेट सीएम विजय माने यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखीच दाढी, तसाच गॉगल आणि फेटा घातलेचा डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून विजय माने अधिक चर्चेत आले आहे.