- काँग्रेसकडून प्रियंका, सोनिया आणि राहुल गांधींचा शिवसेनेला विरोध
- शरद पवारांशी चर्चेनंतर उद्धव यांची काँग्रेस नेत्यांशी देखील चर्चा
- मुंबई / नवी दिल्ली – राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित येऊन सत्ता स्थापनेसाठी तयार असताना आता निर्णय पूर्णपणे काँग्रेसवर अवलंबून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंब्याची तयारी दर्शवली. तरीही काँग्रेसचे सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या पाठिंब्यासाठी तयार नाहीत असे सुत्रांकडून समजते. मीडिया रिपोर्टनुसार, राज्यात शिवसेनेला सत्तेमध्ये येऊन पाठिंबा देणे तर दूर काँग्रेस बाहेरून सुद्धा समर्थन देण्यास तयार नाही. अशात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्याशी फोनवर आणि त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली.