जळगाव : कोरोना लॉक डाऊन पासून बंद असलेली भुसावळ-देवळाली उद्या १५ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. मात्र पूर्वीच्या शटलच्या जागेवर मेमू गाडी धावणार असून गाडीचे ८ स्थानकांवरील थांबेही रद्द करण्यात आले आहेत. त्यामळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
करोना लॉक डाऊनमुळे ही गाडी अडीच वर्षांपासून बंद असल्याने खांदेशात ये-जा करणा-या या रहिवाशांची मोठी गैरसोय होत होती. मात्र भुसावळ-देवळाली (११११४) ही गाडी १५ सप्टेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने जाहीर केला आहे. भुसावळ-देवळाली (११११४) ही गाडी गुरुवारी (दि.१५) सायंकाळी ५.३० वाजता देवळालीसाठी सुटेल. तर देवळाली येथून ही गाडी १६ सप्टेंबरला सकाळी ७.२० वाजता भुसावळसाठी निघेल. ही गाडी आता नवीन नंबरसह सुरु होत आहे. तीच्या वेळेतही बदल करण्यात आलेला आहे. तसेच आता ही गाडी मेमू स्वरुपात आणि एक्स्प्रेसचा दर्जा घेऊन धावणार आहे.त्यामुळे तिकिटाच्या दरातही वाढ झाली आहे. यामुळे प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
हे पण वाचा..
RD मध्ये दरमहा 1000 रुपये जमा करा, 5 वर्षांत मिळतील ‘इतके’ रुपये
अत्याचारातून गतिमंद तरुणी गर्भवती ; जळगाव जिल्ह्यातील संतापजनक घटना
रद्द केलेले थांबे असे
वाघळी, ऊगाव, भादली, पिंपरखेड, पांझण, अस्वली, आेढा, समीट या स्थानकावरील गाडीचे थांबे रद्द केले आहेत. एका स्थानकावरून संबंधित गाडीची किमान २५ तिकीटे काढली गेली पाहिजे, तरच तेथे थांबा असताे. मात्र, ८ स्थानकांवर प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद असल्याने थांबे रद्द केले आहेत.
भुसावळ-वर्धा शुक्रवारपासून
भुसावळ-वर्धा-भुसावळ (१११२१) ही गाडी देखील १६ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. ती दुपारी २.३० वाजता भुसावळ येथून सुटणार आहे. ही गाडी परतीच्या प्रवासात वर्धा येथून शनिवार (दि.१७) रात्री १२.५ वाजता सुटेल. ती सकाळी ७.२५ वाजता भुसावळात पाेहोचेल.