जळगाव : राज्यासह जळगाव जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. अशातच जळगावमध्ये नात्याला काळीमा फासणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे एका वडिलांनी मुलीसोबत असं काही केलं की वाचून तुम्हीही संतापाल. एका वडिलांनी १५ वर्षीय मुलीला मोबाईलमध्ये अश्लिल व्हिडीओ दाखवून तिच्यासोबत अश्लिल कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील तीन वर्षापासून हा घाणेरडा प्रकार सुरू होता. यासंबंधी पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित बापाला अटक करण्यात आली आहे.
बाप आपल्या १५ वर्षीय मुलीला मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवायचा. तसेच तिच्यासोबत अश्लील चाळे करायचा. हा किळसवाना प्रकार मागील तीन वर्षापासून पासून सुरू होता. यात बाप मुलीला तुझ्या आईला घराबाहेर काढून देईल, अशी धमकी द्यायचा. त्यामुळे मुलगी हा सर्व प्रकार सहन करत होती. परंतू मागील काही दिवसांपासून प्रकार वाढल्यामुळे त्याला पीडित मुलगी कंटाळली आणि तिने सर्व घटना तिच्या आईला सांगितली.
हे पण वाचा..
RD मध्ये दरमहा 1000 रुपये जमा करा, 5 वर्षांत मिळतील ‘इतके’ रुपये
अत्याचारातून गतिमंद तरुणी गर्भवती ; जळगाव जिल्ह्यातील संतापजनक घटना
शेतकऱ्यांनो.. PM Kisan च्या पुढील हप्त्याचे पैसे, जमा झाले की नाही तपासण्यासाठी ‘या’ नंबरवर करा कॉल
आईने आपल्या भावांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मंगळवारी रात्री पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. गंभीर घटनेची दखल घेत पोलिसांनी तत्काळ संशयित बापाला अटक केली आहे तर मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचीही माहिती आहे.