मुंबई : राज्यात मागील काही दिवसाच्या खंडानंतर पावसाने जोरदार पुरागमन केलं आहे. मागच्या चार दिवसांपासू सुरू झालेला पाऊस आणखी चार दिवस सक्रीय राहणार असल्याचे हवामान विभागने सांगितले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या कोकण, घाट परिसरात मान्सून सक्रिय आहे. आज मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, पुणे, नाशिक घाट भागात पुढील काही तासांत अधूनमधून जोरदार सरींसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज जळगाव जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मान्सूनच्या शेवटच्या महिन्यात पुन्हा एकदा पावसाने पुनरागमन केल्याने अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. आज कोल्हापूरला ‘यलो अलर्ट’ पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे (घाट-मुसळधार), कोल्हापूर (घाट-मुसळधार), सातारा (घाट-मुसळधार), औरंगाबादसह जळगावसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पावसाचा जोर पाहता स्थानिक प्रशासनाने नदीलगतच्या भागात राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हे पण वाचा..
खळबळजनक ! अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवून सलग चार वर्षे तरुणीवर केला बलात्कार
प्रधानमंत्री वय वंदना योजनेंतर्गत दरमहा मिळेल ‘इतके’ पेन्शन
शेतकऱ्यांना महागड्या डिझेलपासून मिळेल मुक्ती, फुकटात सिंचन करून उत्पन्न वाढेल
राज्यभरात धो-धो कोसळणार, हवामान विभागाचा आजचा अंदाज काय?
दरम्यान, हवामान विभागाने 11 ते 15 सप्टेंबर या कालावधीत काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. समुद्रात ताशी 45 ते 60 किमी. वेगाने वारे वाहणार असण्याची शक्यता वर्तविली. यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मच्छीमारीसाठी जावू नये, असा संदेश आल्याने समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत.