मुंबई : गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीने दर वर-खाली होत असताना दिसून येत आहे. आज जागतिक स्तरावर शेअर बाजार आणि कमोडिटी मार्केटमध्ये मोठी घसरण झाली आहे. डॉलर दिवसागणिक मजबूत होत आहे. त्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या किंमतींवर दिसून येत आहे. आज 3 सप्टेंबर, शनिवारी सोने आणि चांदीचे भाव वधारले आहेत.
आज 3 सप्टेंबर रोजी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 46,650 रुपये झाला आहे. यामध्ये 250 रुपयांची भाव वाढ झाली. तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 50,890 रुपये आहे. यामध्ये 270 रुपयांची वाढ झाली. तर चांदीचा आजचा भाव एका किलोसाठी 52,500 रुपये इतका आहे. चांदीत 200 रुपयांनी भाव वाढले.
हे पण वाचा :
आईस्क्रीमचा हट्ट जीवावर बेतला ; इलेक्ट्रिकचा शॉक लागून चिमुकलीचा मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद
तरुणाचं मावस बहिणीवर जडलं प्रेम ; पण नातं आड आलं अन्.. प्रेमाचा भयावह शेवट
मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा एकदा दणका! राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी नव्याने पाठवणार
छोट्या शिवसैनिकाचे आदित्य ठाकरेंसमोरच घोषणाबाजी ; Video झाला तुफान व्हायरल
राज्यातील चार शहरातील भाव
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,650 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,890 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,680 आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50,920 रुपये आहे. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,680 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50,920 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 46,680 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 50,920 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 525 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.