नाशिक : एकीकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठा दणका देत आदिवासी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेशकुमार बागूल यांना २८ लाख रुपयाची लाच घेताना अटक केल्याचा प्रकार नुकताच घडला असता तोवर आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जीएसटीच्या अधिक्षकाला अटक केली आहे. वींद्र चव्हाणके असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून २४ तासात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन मोठ्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिकमध्ये असलेले राज्याचे आदिवासी विकास आयुक्तालयाच्या बांधकाम विभागात कार्यरत बागुल यांनी एका ठेकेदाराकडे अडीच कोटीचे काम मंजुर करण्यासाठी १२टक्के इतक्या दराने लाचेची मागणी केली होती. यानुसार ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दिली. त्यांनतर सापाला रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली होती. काल रात्रीपासून ही कारवाई सुरु असल्याची माहिती आहे. बागुल यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता सापडेल असे सांगण्यात येते आहे. या कारवाईतील पैशांचा एक फोटोही हाती लागला आहे.
नाशकात जीएसटी अधिकाऱ्यालाही अटक
तर दुसरीकडे सीबीआयच्या लाच लुचपत विभागाने दुसरी एक कारवाई केली आहे. त्यात रवींद्र चव्हाणके या उच्च अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. चव्हाणके हे जीएसटी कर विभागाचे अधीक्षक आहेत. त्यांना नाशिकच्या सिडको कार्यालयातून अटक करण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी भ्रष्टाचाऱ्यांविरोधात मोठ कारवाई सुरु असल्याचे पाहायला मिळते आहे.
हे पण वाचा :
बिग ब्रेकिंग ! शिवसेनेची ‘या’ पक्षासोबत युती, पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंची घोषणा
आज पुन्हा स्वस्त सोनं, चांदीही घसरली; जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा दर
सर्वसामान्यांसाठी खुशखबर.. सणावाराच्या तोंडावर खाद्यतेलाच्या किंमती पुन्हा घसरणार
खळबळजनक ! ८५ वर्षांच्या आजोबांने केला दहा वर्षाच्या नातीवर अत्याचार
ईडी आणि सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी
दिनेशकुमार बागुल यांची ईडी, सीबीआयमार्फत चौकशी करा, अशी मागणी आदिवासी संघटनांनी केली आहे. दिनेशकुमार बागुल च्या काळात कोट्यवधींचे भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही या संघटनांनी केला आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदिवासी मंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.