मुंबई : खाद्यतेलाच्या वाढत्या दराने हैराण झालेल्या सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या किंमती पुन्हा घसरणार आहेत. कारण तुटवड्याच्या काळात सूर्यफूल लागवडीत 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. याचा फायदा येत्या काही दिवसात बाजारात दिसून येईल. त्यामुळे खाद्य तेलाचे भाव उतरतील.
सध्या सरकार खाद्यतेलाच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. त्यात परदेशातील पामतेलाव्यतिरिक्त भारतीय तेलबियावर्गीय पिकांच्या वाढीलाही चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे भविष्यात आयतीवरच अवलंबून न राहता देशातून खाद्यतेलाची गरज भागवता येणार आहे.
भारताला रशियाकडून खाद्यतेलाची मोठी खेप येणार आहेत. तसेच अर्जेंटिना देशातून तेलाचा पुरवठाही वाढला आहे. देशात यंदा सूर्यफुलाची लागवड 1.77 लाख हेक्टरवर करण्यात आली आहे. गेल्या वर्षी हीच लागवड 1.41 लाख हेक्टरवर करण्यात आली होती. म्हणजेच यंदा लागवड 25 टक्क्यांनी वाढली आहे.
हे पण वाचा :
खळबळजनक ! ८५ वर्षांच्या आजोबांने केला दहा वर्षाच्या नातीवर अत्याचार
आमदार, मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांच्या वेतनात वाढ ; आता ‘इतका’ मिळेल पगार
शुक्रवारची ‘ही’ युक्ती आहे खास, कर्ज आणि पैशाचे संकट चुटकीसरशी दूर होईल!
तरुण-तरुणीचा ‘हा’ Video पाहून बसेल 440 वोल्टचा झटका, एकदा पहाच..
एरंडेलची लागवडही 68 टक्क्यांनी वाढली आहे. तेलाची निर्यात वाढली असल्याने किमती काही प्रमाणात स्थिर झाल्या आहेत. देशात कर्नाटकातील शेतकरी सर्वाधिक सूर्यफुलाची लागवड करतो. या राज्यात शेतकऱ्यांनी 1.52 लाख हेक्टर क्षेत्रावर सूर्यफुलाची लागवड केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 50 टक्के अधिक आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही सूर्यफुलाची लागवड मोठ्या प्रमाणात होते.