तो अचानक आला आणि त्या महिलेवर सपा सप तलवारीने वार करू लागला…. असं होतं असतांना पेट्रोल पंपावर उपस्थित इतर कर्मचाऱ्यांसह ग्राहकही भयभीत झाले… अचानक झालेल्या हल्ल्याने भेदरलेल्या परिस्थितीत महिला पुढे पळत होती आणि तलवार हातात घेऊन तो मागे धावत होता…. वार करत होता, ती महिला बचाव करत होती, स्वतःचा जीव वाचवत होती पण त्या व्यक्तीला कुठलीच दया येतं नसल्याने तो तिच्यावर हल्ला चढवीत होता यात ही महिला गंभीर जखमी झाली असून सदर घटना नशिकातील असून आज भर दुपारी ही घटना घडली आहे संपूर्ण घटना सिसिटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या घटनेने परिसरात चांगलीच दहशत पसरली होती.
महिला गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल ….
एका पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका महिलेवर धारदार शस्त्राने एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. या हल्ल्यात ही महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार पाथर्डी गाव शेजारील एका पेट्रोल पंपावर दिवसाढवळ्या झाल्याने शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या पाथर्डी परिसरातील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला…. pic.twitter.com/N4ULsZgGf8
— Pravin sapkale (@Pravinsapkale17) August 25, 2022
घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. इंदिरानगर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. हल्ला करणारा संशयित हा महिलेचा ओळखीचा इसम असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.या दोघांमध्ये जुना वाद असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.