मुंबई : सध्याच्या घडीला दुचाकी चोरीच्या घटना प्रचंड वाढल्या आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या घटनांमुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, तुम्ही सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ पहिले असतील मात्र दुचाकी चोरी करण्याचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला 440 वोल्टचा झटका बसेल.
या व्हिडीओमुळे आपल्याला लक्षात येते की कशाप्रकारे हे चोर चोरी करण्याची वेगवेगळी पद्धत अवलंबतात या व्हिडीओमध्ये एक कपल बाईकची चोरी करत आहे. परंतु त्यांच्या चोरी करण्याची पद्धत जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला हसू येईल. येवढंच काय तर सुरुवातीला तुमच्या लक्षात देखील येणार नाही की, हे कपल चोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
नक्की कशी केली बाईकची चोरी?
या व्हिडीओमध्ये एक तरुणी आणि तरुण दोघेही फोनवर बोलण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे. ते कदाचित काही वेगवेगळ्या लोकांशी बोलत असावेत किंवा एकमेकांना ओळखत देखील नसावेत असंच वाटत आहे.
आधी ही तरुणी फोनवर बोलत बाईक पार्क केलेल्या ठिकाणी पोहोचते. तिच्या हातात एक चावी असते, ही चावी ती तरुणी पार्किंगमध्ये असलेल्या एक-एक बाईकला लावून पाहाते. जेव्हा ही चावी बाईकला लागत नाही, तेव्हा ती समोरी तरुणाला याबाबत खूणावते आणि पुढच्या बाईककडे जाते.
ही तरुणी असा प्रकार तीन ते चार वेळा करते. अखेर शेवटच्या बाईकला ती चावी लागते. ज्यानंतर ही तरुणी त्या तरुणाला खुणावते. तर हा तरुण त्या बाईककडे येतो आणि या बाईकवर बसतो. अखेर हे दोघेही बाईक घेऊन तेथून फरार होतात. चोरीशी संबंधित हा व्हिडीओ videonation.teb नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे.