औरंगाबाद : भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकामधील संवादाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संवादामध्ये जिल्हा परिषद शिक्षक प्रशांत बंब यांना धारेवर धरत चांगलेच वाभाडे काढताना दिसत आहे. प्रशांत बंब यांनी सुरुवातीला या शिक्षकाला आपणास लाज वाटते का? असे विचारले.
यावर बोलताना संतप्त झालेल्या शिक्षकाने तुमच्या कन्नड तालुक्यात शाळेत शौचालय नसल्याने मुले उघड्यावर बसतात, शाळेचे पत्रे उडालेले आहे, असा प्रतिप्रश्न केला. यावर प्रतिउत्तर देताना आमदारांनी तुम्हा शिक्षकांना लाज वाटायला हवी. तुम्ही यासाठी जबाबदार आहात असे म्हंटल्यावर शिक्षक म्हणाला तुम्ही आमदार आहात तुम्हालाच लाज वाटायला हवी, सरकार आम्हाला काम करू देत नाही असे बाणेदारपणे उत्तर दिले.
व्हायरल झालेले संभाषण असे…
आमदार बंब : ग्रामसेवक, कृषी सहाय्यकाशी मी बोललो आहे. काल विधिमंडळात शालेय शिक्षणावर चर्चा झाली. त्यावर काल मी बोललो. मी काय बोलवं हे तुम्ही मला सांगू नका. माझी गोष्ट बरोबर आहे की चुक हे तुम्ही मला सांगू नका.
शिक्षक : तुम्ही कधी कन्नड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा पाहिल्या आहेत का? तिथं शौचालयं नाहीत सर. शाळेच्या छताचे पत्रे उडालेले आहेत. तुमच्या भागातल्या शाळेकडे तुमचं लक्ष आहे का? तुम्ही सरकारी शाळांबाबत एवढं बोलता. पण तुमच्या भागातील शाळांमध्ये शौचालयं नाहीत. मुलं उघड्यावर शौचाला बसतात.
हे पण वाचा :
‘खाऊन 50 खोके माजलेत बोके, विरोधकांच्या घोषणाबाजीनं विधानभवनाचा परिसर दणाणला
मुंबई पोलिसांना हल्ल्याची धमकी, आता पोलीस तपासातून समोर आली ‘ही’ मोठी माहिती
तरुणांसाठी खुशखबर.. राज्यात लवकरच सात हजार पोलिसांची भरती ; गृहमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
महाराष्ट्र हादरला ! विद्यार्थिनीचे अपहरण करून धावत्या कारमध्येच केला बलात्कार
आमदार बंब : मग तुम्हा शिक्षकांना काही लाज वाटत नाही का?
शिक्षक : तुम्ही आमदार आहात. तुम्हाला लाज वाटायला हवी, एक आमदार म्हणून
आमदार बंब : त्याच्यासाठीच आम्ही सभागृहात प्रश्न मांडतो ना…
शिक्षक : तुमच्या भागातले रस्ते कसे आहेत? रस्ते आहेत का? गटारी आहेत का?
आमदार बंब : आहो तुम्ही दारू प्यायला आहात का?
शिक्षक : इथले शिक्षक किती अडचणीमध्ये मुलांना शिकवत आहेत, तुम्हाला माहिती आहे का?
आमदार बंब : अरे काय खोटं बोलता… अरे बाबा तुम्ही जर तसे असता ना, तर स्वत:ची मुलं स्वत:च्या शाळेत शिकवली असती.
शिक्षक : सर मला शिकवू नका, मी माझी मुलगी जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकवली आहे.
आमदार बंब : आहो तुमच्या एकट्याची आहे म्हणून काय झालं. मुर्खासारखं बोलू नका, ओव्हरऑल सांगा.
शिक्षक : बरं तुमची मुलं कोणत्या शाळेत शिकत आहेत? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या… तुम्ही एक आमदार आहात. तुमची मुलं कोणत्या शाळेत शिकत आहेत?
आमदार बंब : आरे तुमच्यामुळंच ना… तुम्ही बरोबर शिकवत नाहीत ना…
शिक्षक : आम्ही बरोबर शिकवतोय. शासन आम्हाला काम करू देत नाही.
आमदार बंब : काय खोटं बोलता… निर्लज्जासारखं… तुमच्यासारख्या निर्लज्जांमुळे तुमची निर्लज्जता आहे की तुम्ही फोनवर असं बोलू शकता.
शिक्षक : तुम्ही लोकप्रतिनिधी आम्हाला काम करु देत नाही.
आमदार प्रशांत बंब आणि शिक्षकामधील हा संवाद सध्या व्हायरल होतोय. ही ऑडिओ क्लिप महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेच विषय बनली आहे.