मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी मुंबई शहरात 26/11 सारखा हल्ला करणार असल्याचा मेसेज मुंबई पोलिसांना मिळाला. या मेसेजनंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान आता यासंदर्भातली मोठी अपडेट समोर येत आहे. गुन्हे शाखेच्या एक अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीप्रमाणे, ज्या नंबर वरून धमकीचा मेसेज आला आहे, तो पाकिस्तानचा नंबर असल्याचं सांगितलं जातंय. पण ज्या आय .पी. एड्रेसचा वापर करून इंटरनेटच्या माध्यमातून व्हाट्सएप मेसेज पाठविला गेला आहे, तो आय .पी. एड्रेस इतर देशाचा आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेला दोहा येथे राहणाऱ्या अनिश नावाच्या व्यक्तीवर संशय आहे. त्याने यापूर्वीही अशाच धमक्या दिल्या होत्या. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणासंदर्भातली सर्व माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
ट्रॅफिक पोलीस कंट्रोल रूमला व्हाट्सएप नंबरवर 26/11 सारख्या अतिरेकी हल्ल्याची धमकी दिली होती, त्याबाबत आता महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी पोलिसांकडून सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जातेय. पोलिसांनी टेलिकॉम कंपनी कडून संबंधित नंबर बाबत माहिती मागवली असून पुढील तपासही केला जातोय. गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितलं की, मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाच्या (ATS) मदतीने करण्यात आलेल्या तपासात नमूद केलेल्या मोबाईल नंबरपैकी पाचपैकी चार नंबर हे यूपीतील बिजनौरचे, तर एक नंबर वसईचा असल्याचं समोर आलंय. या नंबरच्या मदतीने काहीचं लोकशनही ट्रेस करत मुंबई पोलिसांनी तपासाची चक्र पुढील दिशेने वळवली आहेत. दोहा येथे राहणाऱ्या अनीस नावाच्या व्यक्तीवरही पोलिसांना संशय आहे. त्याने यापूर्वीही अशाच धमक्या दिल्या होत्या.
हे पण वाचा :
महाराष्ट्र हादरला ! विद्यार्थिनीचे अपहरण करून धावत्या कारमध्येच केला बलात्कार
मृत्युच्या १२ तासानंतर मुलगी झाली जिवंत ; अंत्यसंस्काराला उपस्थित सर्वच अवाक….
वजन कमी करायचं आहे? हे अप्रतिम पेय प्या; झपाट्याने कमी होईल..
ग्राहकांसाठी खुशखबर.. जळगावात आठवडाभरात सोने-चांदी ‘इतक्या’ रुपयांनी घसरली
कोण आहे अनिश?
सूत्रांच्या माहिती प्रमाणे मुंबई क्राईम ब्रांच उत्तर प्रदेश ए टी एस सोबत संयुक्त रित्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. मुंबई क्राईम ब्राचंची एक टीम यूपीला ही गेली आहे. तिथे युपी एटीएस ने 2 आणखीन लोकांना ताब्यात घेत त्यांची चौकशी मुंबई क्राईम ब्रांच करणार आहे. या व्यतिरिक्त मुंबई क्राईम ब्रांचची एक टीम हरियाणात गेली असून तिथून चौथ्या व्यक्तीला पकडण्यात आलंय. ज्यांचे नंबर व्हॉट्सअपच्या धमकीतील मेसेजमध्ये होते, तेच हे चार लोक असल्याची माहितीही समोर आलीय. मुंबई पोलीस केंद्रीय तपास यंत्रणे सोबत ही पुढील इनवेस्टीगेशन करत असल्याची माहिती मिळतेय. या यंत्रणांच्या मदतीने डोहात बसून मेसेज पाठवण्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला अनिश कोण आहे, याची सखोल चौकशी केली जातेय.