Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोविड काळात पाचोऱ्याची जनता घरांत ; मात्र नगरपरिषदेने काढली भूखंड घोटाळ्याची २०० कोटींची वरात…!

नगरपरिषद प्रशासन व तत्कालीन सत्ताधारी आणि यातील मुख्य सुत्रधारांवर तात्काळ कारवाई करावी- अमोल शिंदे

najarkaid by najarkaid
August 24, 2022
in जळगाव
0
कोविड काळात पाचोऱ्याची जनता घरांत ; मात्र नगरपरिषदेने काढली भूखंड घोटाळ्याची २०० कोटींची वरात…!
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (किशोर रायसाकडा)- कोविड काळात पाचोरेकर जनता जिवाच्या भीतीने घरात सुरक्षित असताना येथील नगरपालिका प्रशासनाने तमाम नागरिकांना अंधारात ठेवून जनतेचा खूप मोठा विश्वास घात केला आहे. थोडीथोडकी नव्हे तर सुमारे २०० कोटी रुपयांची ही फसवणूक असल्याचा अंदाज असून यामध्ये प्रशासन व सत्ताधारी यांनी एकत्रितपणे षडयंत्र करून समाजव्यवस्थेची फसवणूक केली आहे.भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नगर परिषद प्रशासनाच्या कोट्यवधी रुपयांचा भूखंड घोटाळा संदर्भात माहिती दिली आहे.

नगरपालिका प्रशासन व नगर रचना विभाग यांच्यामार्फत प्रत्येक २० वर्षानंतर शहराच्या गरजा व शहर विकासाच्या अनुषंगिक बाबींचा सविस्तरपणे विचार करून नागरिकांच्या सोयीसुविधा व महत्त्वपूर्ण गरजांसाठी विकास आराखडा तयार करण्यात येतो. त्या अनुषंगाने पाचोरा नगरपरिषद हद्दीतील शहर विकास आराखड्यास दि.२०/०२/२०१५ च्या शासन निर्णय नुसार मंजुरी देऊन सदर आराखडा पाचोरा शहरासाठी प्रसिद्ध झाल्यानंतर पाचोरा नगर परिषद हद्दीत अमलात आलेला आहे.त्यानुसार नगर विकास विभागामार्फत शहरांसाठी आवश्यक असणारी भूखंडावरील आरक्षणे महाराष्ट्र नगररचना अधिनियम १९६६ नुसार सर्व प्रक्रिया होऊन अंतिम विकास आराखडा व त्यात आरक्षित केलेल्या जमिनीवर पुढील २० वर्षांच्या काळासाठी शहर विकासाचे साचेबद्ध नियोजन करूनच सदरचा आराखडा अंतिमतः मंजुर करण्यात आला आहे.

परंतु पाचोरा नगरपरिषदेने याबाबतीत मागील न्यायालयांचे निकाल व कायद्याच्या तरतुदींच्या विरोधात जात कोरोना महामारीच्या संकटकाळात संधी साधत शासकीय कार्यालयात फक्त अत्यावश्यक सुविधांवर कामकाज सुरू असताना ऑनलाइन सभांच्या नावाखाली ऑनलाईन मिटिंग घेऊन विरोधी नगरसेवकांना नकळत व अंधारांत ठेऊन चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर ठराव करून घेतले.व पाचोरा शहरातील जवळपास ८ भूखंडावरील आरक्षण रद्द करण्याकरिता पाचोरा नगरपरिषदेचे प्रशासन व तत्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि सत्ताधाऱ्यांनी सदर बेकायदेशीर कृत्य केले आहे.

या संपूर्ण विषयाची माहिती घेतली असता व सखोल चौकशी केली असता एकदा विकास आराखडा मंजूर केल्यावर त्यात बदल करण्यासाठी व रद्द करण्यासाठी नियोजन प्राधिकरणाच्या माध्यमातून लोकांचे आक्षेप मागवले जातात व त्यासाठी व्यापक प्रमाणात मोठ्या खपाच्या वर्तमानपत्रात किंवा इतर प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून हरकती मागविल्या जातात.परंतु हरकती या कमी खपाच्या वर्तमानपत्रात देण्यात आल्या व तसेच कोविड काळात नागरिक वर्तमानपत्र ही घेत नव्हते त्यामुळे इतरत्र कुठेही माहिती मिळाली नाही.कोणास हरकती घेण्यासाठी कोविड निर्बंधांमुळे कदाचित घराबाहेर पडुन हरकत नोंदविता आली नसावी.असे नियोजन बद्ध बेकायदेशीररित्या हे गैरकृत्य घडवून आणले आहे.असे अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले.

तसेच सदर भूखंडावरील आरक्षणे रद्द करण्यासाठी प्रस्तावित केलेले आहे.तेच आरक्षण अन्य दुसऱ्या भूखंडावर टाकणे गरजेचे असते मात्र ते अन्यत्र कुठेही दर्शविले नाही.तसेच सदर आरक्षण रद्द करण्याबाबत च्या भूखंडांचा प्रस्ताव हा सद्यस्थितीत मा.संचालक सो,नगर रचना पुणे यांच्या अंतिम मंजुरीसाठी प्रस्तावित असून सदर बेकायदेशीर व चुकीच्या पद्धतीने ठराव करुन तयार करण्यात आलेले प्रस्तावास अंतिम मान्यता देण्यात येऊ नये.अशी शासनदरबारी मागणी केली आहे. असे देखील अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले.

भूखंडांचे तत्कालीन नगरपालिका सत्ताधाऱ्यांकडून सदर जागेवर आरक्षण कायम असतानाच मुळ मालकासोबत अत्यंत अत्यल्प भावात अनोंदणीकृत सौदापावत्या देखील झाल्या असल्याचे कळते. या भूखंडांचे मुल्यांकन बाजारभावाप्रमाणे काढल्यास अंदाजे २०० कोटी रुपये दिसून येते.तसेच प्रचंड वेगाने वाढत चाललेल्या पाचोरा शहराच्या विकासासाठी भविष्यात गार्डन,प्लेग्राउंड,शॉपिंग सेंटर्स,प्राथमिक व माध्यमिक शाळा,भाजीपाला मार्केट यासारख्या असंख्य सोयीसुविधा साठी भविष्यात जागाच शिल्लक राहणार नाही.या दूरदृष्टीने विचार नकरता उलट पाचोरा नगर परिषदेने शाळा कॉलेज,ग्राउंड व मार्केट हे अगोदरपासूनच उपलब्ध असल्याचे दाखले देत सदरचे आरक्षण गरजेचे नाही.असे दर्शवून आरक्षण रद्द करण्यासाठी शासनाकडे अति घाईने शिफारस केली आहे. अश्या पद्धतीने नगरपालिका प्रशासन व तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या आर्थिक लाभाकरिता शहरातील नागरिकांसह शासनाची देखील दिशाभूल करून फसवणूक केली आहे. असे यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वजन कमी करायचं आहे? हे अप्रतिम पेय प्या; झपाट्याने कमी होईल..

Next Post

बहिणाईंच्या साहित्यात माणूसकीचा मार्ग – माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
बहिणाईंच्या साहित्यात माणूसकीचा मार्ग – माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार

बहिणाईंच्या साहित्यात माणूसकीचा मार्ग – माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us