जळगाव : मागील गेल्या काही महिन्यात सोने आणि चांदीचे दर एका विशिष्ट पातळीवरून वरखाली होत असल्याचे दिसून आले. या महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचा प्रति तोळ्याचा दर ५१ हजारावर होता. मात्र त्यानंतर सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली होती. मात्र सध्या सोनाच्या दरात मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली.
राखी पाैर्णिमेला वधारलेले साेने-चांदीच्या दरात आठवडाभरात ही घसरण हाेऊन साेने प्रति ताेळ्यामागे ५०० रुपये तर चांदी प्रति किलाेमागे ३२५० रुपयांनी स्वस्त झाले आहे. गुरुवारी येणाऱ्या गुरुपुष्यामृत याेगाच्या मुहूर्तावर ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळल्याची व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे. १४ ऑगस्ट राेजी साेन्याचे दर प्रती ताेळा ५३ हजार रुपये हाेते. ते साेमवारी ५२ हजार ५०० पर्यंत खाली आले हाेते. चांदी प्रति किलाे ५९ हजार ५०० वरून ५६ हजार २०० रुपयांवर आली.
हे पण वाचा :
नोकरीची सुवर्णसंधी… DRDO मध्ये हजारो पदांसाठी बंपर भरती, 1 लाखाहून अधिक पगार मिळेल
लग्नाचे आमिष देवून अल्पवयीन मुलीला पळविले, नंतर जे घडलं ते धक्कादायकच..
बॉलिवुडच्या ‘या’ अभिनेत्याला स्त्री वेशात पाहून भल्या भल्यांची झोप उडाली
शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. ग्रामपंचायतीच्या योजनेवर मिळणार 100 टक्के अनुदान, असा घ्या लाभ..
यंदाच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून साेने चांदीच्या दरात तेजी हाेती. त्यामागे अमेरिकन बँकांच्या व्याजदराबद्दलच्या धाेरणात केलेला बदल हाेता.त्यामुळे साेन्याने उच्चाकी ५५ हजार तर चांदीने ६९ हजार रुपयांचे दर नाेंदवले हाेते; परंतु त्यानंतर दरात सारखे चढउतार सुरू आहेत. अाॅगस्ट महिन्यात साेने ५३ हजारांवर स्थिरावले. तर चांदीचे दर ५९ हजाराच्या जवळपास आले. मात्र पुन्हा सप्टेंबरमध्ये ते वाढू शकतात, असे सराफा व्यावसायिक पप्पू बाफना यांनी सांगितले.