Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांना पत्राद्वारे भावनिक साद, काय म्हणाले वाचा..

Editorial Team by Editorial Team
August 24, 2022
in राज्य
0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांना पत्राद्वारे भावनिक साद, काय म्हणाले वाचा..
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यातील शेती आणि शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारे निर्णय जाहीर करतानाच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. शेतकरी बांधवांना भावनिक आवाहन करत ‘रडायचं नाही, लढायचं…अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी बळीराजाला दिलासा दिला.

विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देतांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्यातील शेतकरी बांधवांना उद्देशून लिहिलेले पत्र वाचून दाखविले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र लढवय्यांचा… कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे. भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारे लढाऊ बाण्याचे जवान शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आले आहेत. घाम गाळत जमीन कसून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही केवळ स्वतःचेच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्राची आणि देशाची भूक भागवण्याचेही काम करीत आहात. म्हणून मराठी मातीवर पहिला हक्क शेतकरी बांधवांचा आहे, असे भावनिक उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, नैसर्गिक, कौटुंबिक, आर्थिक संकट आल्यावर तुम्हाला हवालदिल होताना मन कासावीस होऊन जाते, तुमच्यातले काही शेतकरी बांधव अनेक संकटातून सावरताना थकून जातात आणि आत्मघाताचा मार्ग पत्करतात. हे चित्र पाहून मात्र एक सामान्य कष्टकरी कुटुंबातील माणूस म्हणून आणि या महाराष्ट्राचा कारभारी म्हणून मन विषण्ण होऊन जाते. आपल्याच घरातले कुणी आपण गमावल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

हे पण वाचा :

लग्नाचे आमिष देवून अल्पवयीन मुलीला पळविले, नंतर जे घडलं ते धक्कादायकच..

बॉलिवुडच्या ‘या’ अभिनेत्याला स्त्री वेशात पाहून भल्या भल्यांची झोप उडाली

शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. ग्रामपंचायतीच्या योजनेवर मिळणार 100 टक्के अनुदान, असा घ्या लाभ..

जळगाव शहरात मध्यरात्री तरुणाचा खून !

तुम्ही आहात तर छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही. तुम्ही आमची संपत्ती आहात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खेड्या-पाड्यातल्या शिवसैनिकांना नेहमी म्हणायचे, की ‘रडायचं नाही, लढायचं…‘ त्याप्रमाणे तुम्ही खचून न जाता तुमचा तोलामोलाचा जीव वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका. आत्महत्या करू नका, अशी भावनिक साद मुख्यमंत्र्यांनी शेतकरी बांधवांना घातली.

मी तुमच्यासारखा सरळसाधा माणूस आहे. मला तुमच्या वेदना कळतात. काळजाला भिडतात. या आसमानी संकटातून, या सावकारी दुष्टचक्रातून तुम्हाला बाहेर काढण्यास मी कटिबद्ध आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात, आत्मघातात पराभव असतो आणि संघर्षात जगण्याचे लखलखते यश असते. मी आणि माझे सरकार सतत तुमच्या सोबत आहे, याची खात्री बाळगा… जीव देणे बंद करूयात, जीव लावूयात एकमेकांना.. चला, नव्या सूर्याची नवी किरणं गाठीशी बांधूया आणि आपण मिळून छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी या पत्राद्वारे केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लग्नाचे आमिष देवून अल्पवयीन मुलीला पळविले, नंतर जे घडलं ते धक्कादायकच..

Next Post

नोकरीची सुवर्णसंधी… DRDO मध्ये हजारो पदांसाठी बंपर भरती, 1 लाखाहून अधिक पगार मिळेल

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
DRDO मध्ये 630 जागांसाठी बंपर जागा रिक्त ; 88,000 पर्यंत पगार मिळेल

नोकरीची सुवर्णसंधी... DRDO मध्ये हजारो पदांसाठी बंपर भरती, 1 लाखाहून अधिक पगार मिळेल

ताज्या बातम्या

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us